दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून बांगलादेशात पसार झालेला आरोपी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:20 PM2020-01-01T20:20:00+5:302020-01-01T20:28:30+5:30

पत्नीचा खून करून २०१७ मध्ये बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख हा पुन्हा भारतात आला असून तो ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून या पथकाने त्याला ३१ डिसेंबर रोजी अटक केली.

The accused, who was murdered his wife two years ago and absconded to Bangladesh, were finally arrested | दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून बांगलादेशात पसार झालेला आरोपी अखेर जेरबंद

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईपालघरच्या वालीव पोलिसांच्या केले हवालीमृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका खिंडीत दिला होता फेकून

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकून बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख (४५, रा. बांगलादेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. त्याला पालघरच्या वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पत्नीचा खून करून २०१७ मध्ये बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख हा पुन्हा भारतात आला असून तो ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, कैलास सोनवणे, हवालदार मोरे, रवींद्र पाटील आणि नरसिंग महापुरे आदींच्या पथकाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे रेल्वेस्थानक परिसरात सॅटिसखाली सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याने डिसेंबर २०१७ मध्ये त्याची पत्नी पॉली हिचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून तो मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तातिवली खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकला होता, अशी कबुलीही त्याने या पथकाला दिली. विशेष म्हणजे त्याने केलेल्या खुनानंतर त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचा सांगाडा दोन वर्षांनी म्हणजे २१ मार्च २०१९ रोजी पालघरच्या वालीव पोलिसांना मिळाला. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्याला आता वालीव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
........................
निकेत कौशिक यांनी दिले होते आदेश
गेल्या तीन वर्षांतील खून आणि मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी दिले होते. पालघरमध्ये २०१७ मधील दोन, २०१८ मधील सहा आणि २०१९ मधील आठ खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. ठाणे शहर पोलिसांमुळे आता २०१७ मधील दोनपैकी एका खुनाचा छडा लागल्यामुळे आता ही संख्या एकवर आली आहे. तर ठाणे ग्रामीणमधील गेल्या तीन वर्षांतील १४ खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचेही आदेश कौशिक यांनी दिले होते.

Web Title: The accused, who was murdered his wife two years ago and absconded to Bangladesh, were finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.