रेल्वेने वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीतील तस्कराला हैद्राबाद येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:12 PM2019-12-19T22:12:07+5:302019-12-19T22:21:29+5:30

वन्य प्राणी तसेच पक्षांची तस्करी करणा-या चार जणांच्या टोळीतील अब्दूल नबी उर्फ परवेज खान (रा. मिस्त्रीगंज, हैंद्राबाद) या मुख्य तस्कराला ठाणे वनविभागाने हैद्राबाद येथून नुकतीच अटक केली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये वनविभागाने वेगवेगळया प्रजातीचे ४७ पक्षी आणि सात वन्यप्राणी या आरोपींकडून जप्त केले आहेत.

Accused of Wildlife trafficking gang traffickers arrested in Hyderabad | रेल्वेने वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीतील तस्कराला हैद्राबाद येथून अटक

ठाणे वनविभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे वनविभागाची कारवाई सात मुनिया पक्षी आणि १६ सुगरण पक्षी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रेल्वेने वन्य प्राणी तसेच पक्षांची तस्करी करणा-या चार जणांच्या टोळीतील अब्दूल नबी उर्फ परवेज खान (रा. मिस्त्रीगंज, हैंद्राबाद) या मुख्य तस्कराला ठाणेवनविभागाने हैद्राबाद येथून नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून ठिपकेदार सात मुनिया पक्षी तर १६ सुगरण पक्षांची सुटका करण्यात आली आहे. त्याला २१ डिसेंबरपर्यंत वन विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत. याआधी त्याच्या दोन साथीदारांना ठाणे वनविभागानेअटक केली आहे.
रेल्वेने वन्य पक्षी तसेच प्राण्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ठाणे रेल्वे स्थानकातून १० डिसेंबर २०१९ रोजी आर. के. मोहम्मद खलील रियाज अहमद (२४, रा. बैंगलोर, कर्नाटक) याला ताब्यात घेतले होते. त्याच्या ताब्यातून एक घार, तीन शिक्रा, तुरे असलेले एक घुबड आणि एक विदेशी घोरपड असे पाच वन्य जीव ताब्यात घेण्यात आले. त्याला १८ डिसेंबरपर्यंत वन विभागाची कोठडी न्यायालयाने दिली होती. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पक्षी हे हैद्राबाद येथून खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यातील काही पक्षी हे मुंबई येथील शाहरुख खान (रा. भायखळा) आणि किशन रामपाल (रा.मुंबई) यांना तो विक्री करणार होता. त्याच माहितीच्या आधारे शाहरुखला १२ डिसेंबर रोजी तर किशनला १४ डिसेंबर रोजी भायखळा भागातून अटक करण्यात आली. किसन याच्याकडून दोन जांभळया रंगाचे पोपट जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनाही १६ डिसंबरपर्यंत वन विभागाची कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, वरील आरोपींच्या चौकशीतूनच १७ डिसेंबर रोजी ठाण्याचे उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वन संरक्षक बी. टी. कोळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनक्षेत्रपाल मनोज परदेशी, वनपाल संजय पवार आणि वनरक्षक प्रविण आव्हाड यांनी हैद्राबाद येथून मुख्य आरोपी शेख अब्दूल नबी उर्फ परवेज खान याला १७ डिसेंबर रोजी पक्षी विक्री करण्याच्या दुकानातून सात ठिपकेदार मुनिया पक्षी आणि १६ सुगरण पक्षी अशा २३ पक्षांसह अटक केली.
या संपूर्ण कारवाईमध्ये वनविभागाने वेगवेगळया प्रजातीचे ४७ पक्षी आणि सात वन्यप्राणी या आरोपींकडून जप्त केले आहेत. सर्व वन्यप्राणी तसेच पक्षांना त्यांच्या नैसिर्गक अधिवासात निसर्ग मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वन्यजीव विषयक कोणतीही तक्र ार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे वनविभागाने केले आहे.

Web Title: Accused of Wildlife trafficking gang traffickers arrested in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.