मोबाइल चोरल्याच्या आरोपावरून अ‍ॅसिडहल्ला

By admin | Published: November 7, 2015 02:18 AM2015-11-07T02:18:35+5:302015-11-07T02:18:35+5:30

मोबाइल चोरल्याचा आरोप करून ते प्रकरण कारखान्याच्या मालकापर्यंत नेल्याने संतापलेल्या गुड्डू यादव या कामगाराने आरोप करणाऱ्या राजकुमार बळीराम रोहिदास (३५) आणि त्याच्या पत्नीवर

Acidahalla accused of mobile theft | मोबाइल चोरल्याच्या आरोपावरून अ‍ॅसिडहल्ला

मोबाइल चोरल्याच्या आरोपावरून अ‍ॅसिडहल्ला

Next

बोईसर : मोबाइल चोरल्याचा आरोप करून ते प्रकरण कारखान्याच्या मालकापर्यंत नेल्याने संतापलेल्या गुड्डू यादव या कामगाराने आरोप करणाऱ्या राजकुमार बळीराम रोहिदास (३५) आणि त्याच्या पत्नीवर अ‍ॅसिड ओतले. यात राजकुमार याचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गीता देवी (३०) येथील टीमा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
तारापूर एमआयडीसीमधील पॅराडाइज अ‍ॅसिड अ‍ॅण्ड केमिकल्स या कारखान्यातून विविध प्रकारचे अ‍ॅसिड, केमिकल्स व सोलवंटच्या ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी राजकुमार याचा मोबाइल हरवला. तो मोबाइल गुड्डू यादवनेच चोरल्याचा आरोप राजकुमाराने करून ही घटना मालकाला सांगितली. त्यानंतर मालकानेही गुड्डूला मोबाइल चोरीविषयी विचारल्याने गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गुड्डूने कंपनीतीलच ज्वलनशील पदार्थ बादलीमध्ये भरून घेऊन कंपनीच्याच शेडमध्ये गाढ झोपेत असलेल्या राजकुमार पती-पत्नीवर हा हल्ला केला आणि तो फरार झाला.
पावणेदोनच्या सुमारास बोईसर पोलिसांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले, परंतु ९८ टक्के भाजलेल्या राजकुमारचा उपचारादरम्यान तासाभरात मृत्यू झाला तर त्याची पत्नी गीतादेवी ९८ टक्के भाजली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. सुदैवाने राजकुमारची तिन्ही मुले खालच्या रुममध्ये झोपली असल्याने सिुखरूप आहेत. याबाबतीत बोईसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Acidahalla accused of mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.