दोन वर्षांत तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत; १५ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:51 PM2020-03-10T23:51:01+5:302020-03-10T23:51:22+5:30
दुष्परिणाम सांगण्यासाठी पथनाट्याचे आयोजन
जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे ग्रामीण भागात दोन वर्षांत पोलिसांनी तीन कोटी १२ लाख नऊ हजार ७४० रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. याशिवाय, विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नयेत म्हणून शाळा-महाविद्यालयांमधून जनजागृतीही करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी, तसेच शाळा-महाविद्यालयांच्या आवारात कोणीही त्याचे सेवन करू नये, यासाठी ठाणे ग्रामीणच्या विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी व्यापक मोहीम राबविली. याच पार्श्वभूमीवर २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांमध्ये नवघर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ३२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन हजार ६८९ ग्रॅम गांजा, नऊ ग्रॅम मॅफेड्रिन, दोन किलो चरस आणि २५ किलो इफेड्रिन असा तीन कोटी १२ लाख नऊ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. भार्इंदर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीचे चार गुन्हे आणि अमली पदार्थ सेवनाचे २८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये एक हजार ४६७ ग्रॅम गांजा, दोन किलो ४४० ग्रॅम वजनाचा मार्फीन, असा नऊ लाख ९५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे उत्तन सागरी पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीचे पाच आणि सेवनाचे सहा गुन्हे दाखल केले. यात २९ ग्रॅम वजनाचा १६ हजारांचा गांजा जप्त केला आहे.
कारवाईबरोबर जनजागृतीही
अमली पदार्थांची तस्करी तसेच त्यांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईबरोबरच त्याच्या सेवनाने आरोग्यावर होणाºया परिणामांबाबत पोलिसांनी मीरा-भार्इंदर परिसरातील शाळांमध्ये जनजागृतीची मोहीम राबविली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रभातफेºयांचेही आयोजन केले होते. याशिवाय, मोक्याच्या ठिकाणी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तसेच व्हॉटसअॅप गृपद्वारे अमली पदार्थविक्री करणाºयांची माहिती घेऊन ती पोलिसांना कळविण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये तीन कोटी १२ लाखांचा अमली पदार्थ पोलिसांच्या विविध पथकांनी जप्त केला. तरुण पिढीवर कशा प्रकारे अमली पदार्थांचे आघात होत आहेत, त्यांचे आरोग्य कसे ढासळते, याचीही जागृती केल्याने त्याचा चांगला परिणाम जाणवला. ही मोहीम यापुढेही राबविली जाणार आहे. - डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण