अभिनय कट्ट्यावर वि.वा.शिरवाडकर लिखित नाटक बसते आहे एकांकिकेची धम्माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:02 PM2019-11-11T17:02:40+5:302019-11-11T17:05:27+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर नाटक बसते आहे एकांकिका सादर करण्यात आली.
ठाणे : कुसुमाग्रज म्हणजेच आपले लाडके वि.व.शिरवाडकर आपल्या मराठी साहित्यातील एक महामेरू. यांच्या लेखणीतून अवतरलेल्या नाटक बसते आहे ह्या एकांकिकेचे अभिनय कट्ट्यावर धम्माल सादरीकरण झाले.
विक्रमी ५०० व्या कट्ट्याचे वेध लागलेल्या अभिनय कट्ट्याने कट्टा क्रमांक ४५४ वर एक धम्माल विनोदी पुष्प सादर केलेलं.प्रत्येक रविवार आपल्या कलाकृतींचे सादरीकरण करून रसिक मायबाप प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणे हाच अभिनय कट्ट्याचा ध्यास आहे आणि ह्या विक्रमी प्रवासातील आणखी एक पाऊल म्हणजे कट्टा क्रमांक ४५४ वर अभिनय कट्ट्यावरील बालसंस्कार शास्त्रातील कलाकारांनी सादर केलेले वि.वा.शिरवाडकर लिखित किरण नाकती दिग्दर्शित 'नाटक बसते आहे'. एखाद नाटक बसवताना कलाकार रंगमंच व्यवस्था लेखक दिग्दर्शक निर्माते ह्यांच्यातील गोंधळा मध्ये नाटक बसता बसता कस कोलमडत आणि व्यावसायिकिकरणाच्या नावाखाली संहितेचा बट्ट्याबोळ होतो ह्याची रंगतदार हसत खेळत मांडलेलं नाट्य म्हणजे नाटक बसते आहे.सादर नाटकात श्रेयस साळुंखे (दिग्दर्शक),अद्वैत मापगावकर(सहादू),आदित्य भोईर(पेंटर मास्टर),प्रथम नाईक(बाला शेठ), स्वस्तिका बेलवलकर (व्यवस्थापक),पूर्वा तटकरे (चमेली बाई), वैष्णवी चेऊलकर(लेखिका),चिन्मय मोर्ये (मावशी) सहदेव साळकर(नानशेठ) आणि रुचिता भालेराव(सूत्रधार) ह्यांनी भूमिका साकारल्या.प्रकाशयोजना आणि संगीत ह्यांची जबाबदारी आदित्य नाकती, नेपथ्य परेश दळवी आणि रंगभूषा दीपक वाडेकर ह्यांनी सांभाळले.नाटक हसते आहे ने उपस्थित प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले. बालकलाकारांनी ज्या पद्धतीने वि वा शिरवाडकर यांच्या संहितेला आपल्या अभिनय कौशल्याने न्याय द्यायचा प्रयत्न केला. खरंतर लहान मुलांनी हे नाटक सादर करणे खरच आव्हानात्मक पण अभिनय कट्ट्याचे बालकलाकारांनी ते सादर करून अभिनय कट्ट्याचा कलाकार प्रत्येक आव्हान लीलया झेलू शकतो हे सिद्ध केलं असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी मत व्यक्त केले.