ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडल्या 'शब्दवेड्या भावना..', कट्टा निघाला काव्यरंगात न्हाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:51 PM2019-09-24T16:51:34+5:302019-09-24T16:53:48+5:30
अभिनय कट्टा क्रमांक ४४७ वर शब्दातून उलगडल्या शब्दवेड्या भावना.
ठाणे : कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या कट्टा क्रमांक ४४७ अभिनय कट्टा काव्यरंगात न्हाऊन निघाला. नवोदित कलाकारांसाठी स्वतःच्या कलागुणांना सादर करून आत्मविश्वास मिळवून देणार टॉनिक म्हणजे अभिनय कट्टा. अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याच्या कवितांचे अभिवाचिक सादरीकरण म्हणजे 'शब्दवेड्या भावना'. अनेक अबोल भावनांना शब्दामधून अनुभवण्याची एक काव्यमय संध्याकाळ म्हणजे 'शब्दवेड्या भावना'.
अभिनय कट्ट्यावर आजवर लेखन, अभिनय, नेपथ्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाने प्रामाणिकपणे रंगभूमीची सेवा करताना स्वतःमधील कलाकाराला सजक घडवणारा अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याच्या कवितांचे उलगडत जाणारे भावविश्व म्हणजे *'शब्दवेड्या भावना'.* 'शब्दवेड्या भावना' म्हणजे आयुष्यातील विविध व्यक्त अव्यक्त भावभावनांच शाब्दिक चित्रण. प्रेम,विरह, नात्यांमधील बंध, जिद्द, आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन म्हणजे 'शब्दवेड्या भावना'.सादर कार्यक्रमात परेश दळवींच्या *मी अजून चालत आहे,प्रेम,अस जगावं, नाद नाही करायचा,प्रेयसी,अबोल पत्र,एकांत,ओळखलंत का मॅडम मझला, तो एक क्षण, शेवटचे कर्ज, माझी सखी, नदीकिनारी, माझी आई, देवयानी, नजर, गम, शायर, फर्स्ट इयर का प्यार अनपेक्षित तू* या कवितांचं सादरीकरण परेश दळवी, आदित्य नाकती, कदिर शेख आणि न्युतन लंके ह्यांनी अभिवाचिक सादरीकरण केले. आजचा कट्टा खरचअभिनय कट्टा तसेच प्रत्येक कट्टेकऱ्यासाठी विशेष होता कारण अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याच्या कवितांचे सादरीकरण 'शब्दवेड्या भावना' सादर झाल्या.परेश च्या कविता ह्या प्रत्येकाला कुठेतरी मनाच्या जवळच्या वाटल्या कारण त्या प्रेम, विरह, मैत्री, पाऊस, आई, वडील आणि नात्यातील बांध आणि सामान्य माणसाच जीवन ह्याच शाब्दिक भावविश्व अलगद उभं करतात असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी केले. सदर कार्यक्रमात अभिनय कट्टा बालसंस्कार शास्त्राचे बालकलाकार श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्य,आदित्य भोईर,स्वस्तिका बेलवलकर, अद्वैत मापगावकर, पूर्व तटकरे, रुचिता भालेराव, सई कदम यांनी सुद्धा विविध कवितांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन किरण नाकती ह्यांनी केले.