लोकलचे दार अडवणाऱ्या २५ महिलांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:50 AM2019-04-18T01:50:54+5:302019-04-18T01:50:57+5:30

लोकलचे दार अडवणाऱ्यांवर ठाणे जीआरपी आणि दिवा आरपीएफ यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून तीन दिवसांत २५ महिलांना पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Action on 25 women who blocked the local door | लोकलचे दार अडवणाऱ्या २५ महिलांवर कारवाई

लोकलचे दार अडवणाऱ्या २५ महिलांवर कारवाई

Next

ठाणे : लोकलचे दार अडवणाऱ्यांवर ठाणे जीआरपी आणि दिवा आरपीएफ यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून तीन दिवसांत २५ महिलांना पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळी कर्जतहून सुटणाºया सीएसएमटी जलद लोकलमधील महिला दरवाजा अडवून धरतात. त्यामुळे दिव्यातील महिलांना चढता येत नाही. त्यातून दिव्यात गुरुवारी ४ एप्रिल रोजी झालेल्या रेल रोकोनंतर दार अडवणाºयांवर आरपीएफने कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यानुसार, सकाळी गर्दीच्या वेळेस लोकलचे दरवाजे अडवणाºया ७३ महिला आणि पुरुषांवर कारवाई केली आहे.
ही कारवाई भारतीय रेल्वे अधिनियम १५५ (२) याप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये पकडण्यात येणाºयांना रेल्वे न्यायालयात उभे केले जाते. त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती २०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली असून ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>तीन दिवसांत २५ महिलांना पकडले
महिलांच्या डब्यात दार अडवणाºयांवर कारवाई करण्यासाठी ‘आरपीएफ’ने ‘जीआरपी’ची मदत घेऊन संयुक्तरीत्या कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत २५ महिलांना पकडले आहे. त्यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी ११ जणींना पकडले आहे.
>महिलांवर कारवाई करत असल्याचा दावा
दिव्यात महिलांच्या डब्यात होमगार्डच्या मदतीने कारवाई करत असल्याचा दावा ‘जीआरपी’ने केला. ही कारवाई भारतीय रेल्वे अ‍ॅक्टनुसार होत असल्याने महिलांना पकडून ‘आरपीएफ’च्या हवाली केल्याची माहिती जीआरपी सूत्रांनी दिली.

Web Title: Action on 25 women who blocked the local door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.