लवादाच्या दणक्यानंतर कारवाई
By admin | Published: April 5, 2016 01:21 AM2016-04-05T01:21:25+5:302016-04-05T01:21:25+5:30
डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक पट्ट्यांतील कारखान्यांतील प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या, त्यातून राष्ट्रीय हरित लवादाच्या टीकेचे धनी
कल्याण : डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक पट्ट्यांतील कारखान्यांतील प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या, त्यातून राष्ट्रीय हरित लवादाच्या टीकेचे धनी ठरलेल्या राज्य प्रदूषण मंडळाने खडबडून जागे होत २८ लहानमोठ्या उद्योगांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांनी तातडीने नऊ प्रदूषणकारी कारखाने बंद केले असून सहा कारखान्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. १२ कारखान्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंडळाकडून चालवले जात नसल्याने आम्ही त्याबाबत हमीपत्र देऊ शकत नाही. या प्रक्रिया केंद्राला सुधारणेसाठी आम्ही वारंवार बजावले आहे. एखाद्या कारखान्यातून प्रदूषण होते की नाही, याचे पुरावे मिळाल्याशिवाय तो बंद करण्याची नोटीस देता येत नाही. पुरावे मिळाले तर कारखान्यांविरोधात नक्कीच कारवाई केली जाईल, असे संगेवार यांनी सांगितले.