उल्हासनगरात गुटखा विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ४ जणांवर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: December 8, 2023 05:34 PM2023-12-08T17:34:33+5:302023-12-08T17:35:18+5:30

कॅम्प नं-५ परिसरातील ३ पान टपऱ्या व एका किराणा दुकानात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरवारी कारवाई केली.

Action against 4 people selling gutkha in Ulhasnagar | उल्हासनगरात गुटखा विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ४ जणांवर गुन्हा दाखल

उल्हासनगरात गुटखा विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ४ जणांवर गुन्हा दाखल

सदानंद नाईक,उल्हासनगर : कॅम्प नं-५ परिसरातील ३ पान टपऱ्या व एका किराणा दुकानात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरवारी कारवाई केली. याप्रकरणी ४ जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. 

उल्हासनगरातील पान टपऱ्या व किराणा दुकान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टार्गेटवर आले आहे. कॅम्प नं-५ परिसरातील पान टपरी चालक अनिल अर्जुनदास वाधवा, अर्जुन होतुमल लच्छनी, गोविंदकुमार ननहक शाहू तसेच किराणा दुकानदार पवनकुमार संतोषकुमार शाहू हे शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आल्या होत्या. विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अरफना विरकायदे यांच्या पथकाने गुरवारी ४ जणांवर कारवाई केली. त्यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. गेल्याच महिन्यात गुटखा विकणाऱ्या पान टपऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली होती.

Web Title: Action against 4 people selling gutkha in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.