फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे, पण कुठे? खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:45 AM2017-09-16T05:45:57+5:302017-09-16T05:46:16+5:30

कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते.

 Action against the hawkers, but where? Consumption of food trains | फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे, पण कुठे? खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमात

फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे, पण कुठे? खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमात

googlenewsNext

 कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई सुरू आहे पण कुठे? असा सवाल उपस्थित झाला आहे.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर आयुक्त पी. वेलरासू यांनी यापुढे पोलिस आणि पालिका संयुक्त कारवाई उघडणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. संयुक्त कारवाईला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने पालिकेच्या पथकांकडूनच कारवाई सुरू आहे. सायंकाळी होणारी दोन तासाची कारवाई वगळता उरलेला काळ रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र सर्रास आहे.
ही कारवाई केवळ टोपलीधारक आणि दुकानांबाहेर ठेले लावणाºया फेरीवाल्यांवर होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांंकडे सोयीस्कर कानाडोळा केला जात आहे. पावसाळयात उघड्यावर खाद्यपदार्थांच्या विक्रीला बंदी असताना डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक उर्सेकरवाडीत, उद्यानांच्या परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमाने सुरू आहेत. त्याच भागात फेरीवाल्यांवर कारवाई होत असताना या गाड्यांंकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. सुरक्षेची कोणतीहीह काळजी न घेता भर गर्दीत उघड्यावर सिलिंडर ठेवून, शेगड्या ठेवून खाद्यपदार्थ शिजवून विकण्याचे प्रकार सुरू आहेत. असेच चित्र कल्याणमध्येही आहे.
डोंबिवलीत एका फेरीवाल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचाºयांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचा प्रकारही नुकताच घडला. पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांत हे धाडस येते कोठून, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वच्छतेनंतरही कचरा-अतिक्रमण जैसे थे
रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर दर १५ दिवसांनी स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्त पी. वेलरासू यांनी दिल्याने बुधवारी मध्यरात्री स्वच्छता होताच दुसºया दिवशीच स्कायवॉकवर जागोजागी कचºयाचे ढीग साठले. त्यात फेरीवाल्यांचे बस्तान कायम राहिल्याने आयुक्तांचा आदेश कठोर कारवाईअभावी कागदावरच राहिला आहे.
या सफाईत अग्निशमन विभागाचाही समावेश आयुक्तांनी केला होता, पण त्याला भारतीय कामगार सेनेने विरोध करत सहकार्य न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर सफाई कामगारांकडून स्कायवॉकची स्वच्छता करून घेण्यात आली. बुधवारी रात्री ११ ते पहाटे ३ पर्यंत स्कायवॉकचा परिसर स्वच्छ केला.
या स्वच्छ स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पुन्हा कचºयाचे साम्राज्य, मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसले. तेथे गर्दुल्ल्यांचा वावरही कायम असल्याचे आढळले. मद्याच्या बाटल्यांमुळे स्कायवॉक दारूडयांचा अड्डा झाल्याचेही समोर आले.

Web Title:  Action against the hawkers, but where? Consumption of food trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.