उल्हासनगरात बेवारस शेकडो वाहनांवर कारवाई
By सदानंद नाईक | Published: November 16, 2022 04:15 PM2022-11-16T16:15:01+5:302022-11-16T16:15:30+5:30
शहरातील रस्ते, उद्यान, चौक आदी ठिकाणी बेवारस वाहने पडून असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
उल्हासनगर : शहरातील रस्ते, उद्यान, चौक आदी ठिकाणी बेवारस वाहने पडून असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. महापालिकेने बुधवारी विशेष मोहीम राबवून बेवारस वाहनावर स्टिकर लावून वाहने उचलले नाहीतर कारवाईचा इशारा अतिरिक आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिला.
उल्हासनगरातील रस्त्याच्या बाजूला, उद्यान शेजारी, चौकात शेकडो बेवारस वाहने वर्षानुवर्षे बंद अवस्थेत पडून आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन शहराचे विद्रुपीकरण झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. वर्षोनुवर्षे एकाच जागी उभी असलेल्या वाहना खालील जागा स्वच्छता करता येत नाही. यामुळे अशी बेवारस वाहने हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीला महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी व शहर वाहतुक शाखा अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बेवारस वाहनावर सुरवातीला स्टिकर वाहून, वाहने हटविण्याची विनंती संबंधितांना करण्यात येणार आहे. त्यानंतरही वाहने न हटविल्या वाहनावर कारवाई करून एका जागी जमा करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली.
महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह प्रभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बेवारस शेकडो वाहनांवर महापालिका कर्मचाऱ्यांनी स्टिकर लावण्यात आल्याची माहिती शिंपी यांनी दिली. बेवारस वाहनांवर नोटीसचे स्टिकर लाऊन वाहन मालकांना सदरची वाहने हटविण्यासाठी इशारावजा सूचना देण्यात आला. विहित मुदतीत त्यांनी बेवारस वाहन न हटविल्यास महापालिका व पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करुन सदरचे बेवारस वाहन जप्त करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.