RTO कडून रिक्षावर कारवाई; महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसही सोबतीला

By सदानंद नाईक | Published: February 8, 2023 06:27 PM2023-02-08T18:27:10+5:302023-02-08T18:27:46+5:30

सदरचा परिसर रेल्वे स्थानकाला लागून असल्याने प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी वाहतुक कोंडीमुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. 

Action against rickshaws by RTO, municipal authorities and traffic police in Ulhasnagar | RTO कडून रिक्षावर कारवाई; महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसही सोबतीला

RTO कडून रिक्षावर कारवाई; महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसही सोबतीला

googlenewsNext

सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात बेशिस्तपणे रिक्षा स्टँडवर रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षावर आरटीओ, महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. यासंयुक्त कारवाईमुळे जुने व विनापरवाना रिक्षा गायब झाल्याचे चित्र होते.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसेच कल्याण अंबरनाथ रस्त्यावरील रिक्षा स्टँड, शहरातील मुख्य चौक व रस्त्याच्या दुतर्फात शेकडो रिक्षा हे नियमाचे उल्लंघन करून वेडावाकडा उभ्या करीत आहेत. रेल्वे स्टेशन समोर मंजूर क्षमतेपेक्षा अधिक रिक्षा असल्याने व पार्कींगबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत आहे. सदरचा परिसर रेल्वे स्थानकाला लागून असल्याने प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी वाहतुक कोंडीमुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्र-२ च्या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, शहर वाहतुक शाखा यांनी बुधवारी कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरील, फर्निचर बाजार, कॅम्प नं-३ या परिसरातील अनधिकृत रिक्षा स्टँडवर वेड्यावाकड्या उभ्या असलेल्या रिक्षा यांचे विरुध्द धडक कारवाई केली. सदर कारवाईत अनधिकृत रिक्षा थांब्यावर वेड्यावाकड्या उभ्या असलेल्या रिक्षा चालक व मालक यांचेविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी यांच्यासह प्रभाग अधिकारी, शहर वाहतुक शाखा यांनीं सहभाग नोंदविला आहे. तसेच शहरातील रिक्षा चालक व मालक यांना आवाहन।केले की, यापुढे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, महापालिका पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी व शहर वाहतुक शाखा हे संयुक्तपणे कारवा करणार आहेत. या कारवाईने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Action against rickshaws by RTO, municipal authorities and traffic police in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.