अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:20+5:302021-09-07T04:49:20+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेने सोमवारीही नौपाडा, कोर्ट नाकासह पाचपाखाडी परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करून साहित्य जप्त केले. या कारवाई ...

Action against unauthorized peddlers continues | अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने सोमवारीही नौपाडा, कोर्ट नाकासह पाचपाखाडी परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करून साहित्य जप्त केले. या कारवाई अंतर्गत नौपाड्यातील अलोक हॉटेल, गावदेवी, तीनहात नाका, राममारुती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील सामान जप्त केले, तसेच स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका व कोर्ट नाका येथील २० फळांच्या पाट्या जप्त केल्या, तर दौलतनगर ते भाजी मार्केट, सिद्धार्थनगर, स्टेशन रोड व मंगला स्कूल या परिसरातील फेरीवाल्यांवरही कारवाई करून, प्रेमनगर येथील दोन प्लास्टीक शेड काढून वजन काटा जप्त केला. कळवा स्टेशन रोड ते कळवा भाजी मार्केट व खारेगाव मार्केट परिसरातही फेरीवाल्यांवर कारवाई केली.

पाचपाखाडीत ठामपा मुख्यालयासमोर व खोपट रोड अभिषेक हॉटेलजवळील अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर कारवाई करून, अनधिकृत पोस्टर्स काढली, तर मुंब्रातील टीएमसी हॉस्पिटल कम्पाउंड वॉललगत उभारलेली झोपडी तोडून विटावा गावातील बॅनर काढले. यासोबतच दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, दातिवली रोड व मुंब्रादेवी कॉलनी रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविले. यामध्ये चार हातगाड्या, दोन लोखंडी स्टॉल्स जप्त करून, तीन अनधिकृत शेड तोडून ५० अनधिकृत बॅनर काढले.

Web Title: Action against unauthorized peddlers continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.