अनधिकृत नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:56+5:302021-02-19T04:30:56+5:30

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी केली जात असून अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून शहरातील डाइंग, सायझिंगसाठी बेकायदा ...

Action against unauthorized plumbers | अनधिकृत नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई

अनधिकृत नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई

Next

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी केली जात असून अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून शहरातील डाइंग, सायझिंगसाठी बेकायदा पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याची दखल घेत आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशानंतर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप पटणावर यांनी प्रभाग समितीअंतर्गत चारमधील गटार व नाल्यातून घेण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडणीवर कारवाई करीत ते तोडले. पाणीचोरी करणारे डाइंग, सायझिंगचे मालक यांच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवीन गौरीपाडा येथील मेमन सायझिंगचे मालक शोयब मेमन यांनी तर दुसऱ्या प्रकरणात तपस्या डाइंगचे मालक सुशील रायका यांनी गटारातून व गटारावरून पीव्हीसी पाइपमधून ही नळजोडणी केली होती. महापालिकेच्या गटार व चेंबरचे नुकसान केल्याने पोलिसांनी दोन्ही प्रकरणात नारपोली व भोईवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Action against unauthorized plumbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.