नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:56+5:302021-09-08T04:48:56+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त तसेच भिवंडी पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार निजामपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त तसेच भिवंडी पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार निजामपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता समिती सदस्यांची विशेष बैठक मंगळवारी भिवंडी मनपाच्या दालनात पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक दीप बने, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, संदीप सुकरे, गणेशोत्सव मंडळाच्या वैशाली मेस्त्री, माजी नगरसेवक महेश जगताप, महामंडळाचे माजी अध्यक्ष शरद भसाळे, वसीम खान, विशाल डुंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले की, मंडळांनी पोलीस व शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. कोविड संसर्गाचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशाची मूर्तीची उंची मर्यादेत असावी. तसेच विसर्जन स्थळावर गर्दी न करता फिजिकल डिस्टन नियमांचे पालन करून विसर्जन सोहळा संपन्न करावा. उत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस व मनपाची परवानगी घ्यावी.
सामाजिक उपक्रम राबवा’
गणेश मंडळांनी आरोग्य विषयक, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले. शासनाने जे निर्बंध लागू केले आहेत. त्याला कुठलीही शिथिलता गणेशोत्सव काळात देण्यात आली नाही. त्यामुळे या काळात कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, नागरिक मास्कचा वापर करा मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा पोलीस कारवाई करतील, असा इशारा त्यांनी दिला.