ठाणे जिल्ह्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळ बंदची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 10:06 PM2017-11-18T22:06:25+5:302017-11-18T22:06:48+5:30
ठाणे जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे.
सुरेश लोखंडे/ ठाणे : जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. यातील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश देऊन त्याच्या येण्याजाण्यासाठी वाहन व्यवस्था न केल्यामुळे जिल्ह्यातील गावखेड्यतील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. यामुळे गावक-यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा कमी विद्यार्थी संख्ये अभावी बंद करण्याची कारवाई शिक्षण विभागाव्दारे करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषद व पाचही पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे रणशिंगही फुंकण्यात आले आहेत. त्यात २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. यानुसार अंबरनाथ तालुक्यातील बोराडपाडा परिसरातील सिंधीपाडा, वा-याचा पाडा, लव्हाळी येतील तीन शाळा दोन दिवसांपूर्वीच बंद केल्या आहेत. या शाळांवरील शिक्षकाना आता अंबरनाथ पंचायत समितीमध्ये काम देण्यात आले. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये प्रवेश न करता व त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था न करता त्यांना वाºयावर सोडून देण्यात आल्यामुळे या गावांमधील पालकांकडून सांगितले जात आहे.
अंबरनाथ तालुक्यातील सुमारे १८ शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये आस्नोली बारवीडॅम, शिंदीपाडा, वाडी, भिनारपाडा, कातकरीवाडी, दात्रयाचीवाडी, भेंडीपाडा, साई, सावरोली, कोपºयाचीवाडी, पादीरपाडा, उमरोली, बांधनवाडी, डोणे या शाळां बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यातील सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. या शाळांचे सुमारे २१ शिक्षकाना त्यांची दैनंदिन हजेरी अंबरनाथ पंचायत समितीवर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रमाणेच मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. जिल्ह्यात केवळ दहा शाळा बंद करण्याची कारवाई झाल्याचे शिक्षणाधिकारी मीना यादव शेंडकर यांनी पत्रकाराना सांगितले होते. मात्र अंबनाथ तालुक्यातच १८ शाळा बंद होत असून उर्वरित चार तालुक्यात अशा सुमारे कितीतरी शाळा बंद होत असल्याचे निदर्शनात आले आहे. यावरून शिक्षण विभागाकडून दिशाभूल केली जात असल्याची चर्चा आहे.
सुमारे वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. यामध्ये एक ते पाच विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांसह सहा ते दहा, ११ ते १५ आणि १६ ते २० विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांचा समावेश आहे. मात्र या शाळा बंद करण्यापूर्वी त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या म्हणजे एक किमी. परिसरातील शाळांमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. याशिवाय त्याना येजा करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे अपेक्षित आहेत. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडण्यात आल्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा बंद करण्यासाठी प्रथम संबंधीत ग्राम पंचायतीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव असणे अपेक्षित आहे. परंतु तसे ठराव नसतानाही शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येत असल्यामुळे गावकरी व प्रशासन यांच्यात कोणत्याही क्षणी तीव्र संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता आहे.
कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. शासन आदेशानुसार या शाळा बंद केल्या जात असून त्यांचा आढावा लवकरच घेण्यात येईल. मात्र या शाळेच्या विद्यार्थ्यांची जवळच्या शाळेत व्यवस्था करण्यात येत आहे.
- विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. ठाणे