‘ईडी’ची ७ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ठाण्यातील मॉलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:35 AM2018-02-17T01:35:11+5:302018-02-17T01:36:07+5:30

पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा घडवल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदींशी संबंधित ठाण्यातील एका मॉलमधील सात कोटींच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली.

 Action for 'ED' property worth Rs. 7 crores; | ‘ईडी’ची ७ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ठाण्यातील मॉलवर कारवाई

‘ईडी’ची ७ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ठाण्यातील मॉलवर कारवाई

Next

ठाणे : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा घडवल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदींशी संबंधित ठाण्यातील एका मॉलमधील सात कोटींच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. यात ‘जिली’ या हिºयाच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरूममधील ‘जिली’च्या काउंटरवर छापे मारून ते रात्री उशिरा सीलबंद केले.
अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागाचे सहायक संचालक अंजन चंदा यांच्यासह आठ जणांच्या पथकाने तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या अधिका-यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आधी विवियाना मॉलच्या तळ मजल्यावरील ‘जिली’ या हिºयाच्या दागिन्यांच्या ‘शॉपर्स स्टॉप’मधील शोरूमच्या काउंटरचा ताबा घेतला. या काउंटरवरच काही प्रतिष्ठित पंचांना पाचारण करून त्यांनी तिथे असलेल्या कर्मचाºयांकडून कागदपत्रांची आणि दागिन्यांची तपासणी सुरू केली. ती सुरूअसतानाच चंदा यांच्या दुसºया चार जणांच्या पथकाने ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘जिली’च्या मुख्य दुकानावरही धाड टाकली. अचानक सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे सुरुवातीला या दुकानातील कर्मचारी पूर्णपणे गोंधळले होते. मालक नसल्यामुळे आमच्याकडे काहीच माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, आम्ही ‘ईडी’ डिपार्टमेंट आणि पंजाब नॅशनल बँकेतून आलो आहोत. आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा’, असे आवाहन ओळखपत्र दाखवून या अधिकाºयांनी केल्यानंतर याठिकाणीही काही पंचांना बोलावून प्रत्येक काउंटर आणि दागिन्यांची माहिती घेऊन त्यांची नोंद करण्यात आली. गुरुवारी रात्री १२.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. संपूर्ण दागिने, रोकड आणि कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर या दोन्ही दुकानांना रीतसर सील करण्यात आले. यापुढे ही दुकाने पुढील कारवाई होईपर्यंत बंद राहतील असेही या अधिकाºयांनी दोन्ही दुकानांतील कर्मचाºयांना बजावले.
‘जिली’मध्ये चार कोटींची, तर ‘शॉपर्स स्टॉप’ शोरूममधील ‘जिली’च्या काउंटरमध्ये तीन कोटींची मालमत्ता असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता केवळ ही दुकाने सीलबंद करण्याची कारवाई झाली असून येत्या तीन ते चार दिवसात दोन्ही दुकानांतील ऐवजाच्या मूल्यांकनाचे काम केले जाणार असल्याची माहिती ईडीच्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.

मेहुल चोकसीची मालमत्ता
ठाण्यातील सीलबंद केलेली गिली आणि शॉपर्स स्टॉपमधील काउंटर्स ही दोन्ही दुकाने नीरव मोदीचा भागीदार मेहुल चोकसीची असून त्यांना वित्तीय पुरवठा करताना कोणत्या बँक अधिकाºयाने मदत केली, याचीही सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती या अधिकाºयाने दिली.
चार वेगवेगळ्या पथकांकडून सहायक संचालक दर्जाच्या अधिकाºयांच्या अधिपत्याखाली ठाण्यातील त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यात येत आहे. ठाण्यातील मालमत्ता ३० ते ४० कोटींच्या घरात असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title:  Action for 'ED' property worth Rs. 7 crores;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा