हातगाड्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:20 AM2017-08-02T02:20:55+5:302017-08-02T02:20:55+5:30

शहरातील हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली. रस्त्याच्या बाजूला विनापरवाना वडापाव विकणे

Action on the Hounds | हातगाड्यांवर कारवाई

हातगाड्यांवर कारवाई

Next

उल्हासनगर : शहरातील हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली. रस्त्याच्या बाजूला विनापरवाना वडापाव विकणे, दुचाकी दुरूस्त करून कोंडीस कारणीभूत ठरणाºया तिघांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.
उल्हासनगरातील मुख्य रस्त्यासह चौकाचा व पदपथाचा ताबा हातीगाडीवाल्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोंडी निर्माण झाली असून मध्यवर्ती पोलिसांनी अशांवर दंडुका उगारला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे हवालदार एस. बी. दहीफळे यांनी महापालिका मुख्यालयामागील रस्त्याच्या बाजूला दुचाकी दुरूस्तीचा व्यवसाय करणारा रामसेवक पाल (३०) याला वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरवत गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक हेमंत पाटील व विनोद कामडी यांनी सपना गार्डन व शांतीनगर येथे रस्त्याच्या बाजूला वडापाव विक्री करणारा अख्तर शेख व सुनील हलवाई यांच्यावर कारवाई करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

Web Title: Action on the Hounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.