आरक्षित भूखंडावरील बेकायदा बांधकामावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:16 AM2021-02-21T05:16:40+5:302021-02-21T05:16:40+5:30
डोंबिवली : खांबाळपाडा येथील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा उभ्या केलेल्या सहा मजली बांधकामावर गुरुवारी फ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत ...
डोंबिवली : खांबाळपाडा येथील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा उभ्या केलेल्या सहा मजली बांधकामावर गुरुवारी फ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्यासह पथकाने कारवाई केली.
आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने महापालिका क्षेत्रातील बेकायदा कामांवर तीन दिवसात डोंबिवलीमध्ये ह, फ, आय प्रभागात कारवाई करण्यात आली. ग प्रभागात आणि २७ गावातही काही प्रभागात बेकायदा बांधकाम सुरू असून त्याला कोणाचा वरदहस्त आहे का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केला आहे. अशीच कारवाई सुरू राहावी अशी अपेक्षा दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच या बांधकामावर कारवाई करताना ते जमीनदोस्त करण्यात यावे जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी बांधकाम करून सामान्य नागरिकांची फसवणूक होणार? नाही याकडे आयुक्तांनी लक्ष द्यायला हवे असेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच यापूर्वीं कारवाई झालेल्या इमारती अर्धवट कारवाईमुळे पुन्हा उभ्या झाल्यात का? झाल्या असतील तर त्यावर काय कारवाई होणार? आणि पुन्हा इमारत कशी काय उभी राहिली, त्याला महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या काळात झाली त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार आहे याबाबतही आयुक्तांनी चौकशी करून कार्यवाही करायला हवी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
------
फ प्रभागातील बेकायदा बांधकाम कारवाईचे फोटो आहेत