उल्हासनगरात अवैध बांधकामावर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 03:25 PM2019-01-11T15:25:43+5:302019-01-11T15:25:56+5:30

 महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत अवैध बांधकामे  जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने सुरू होती, यांची खमंग चर्चा शहरात सुरु झाली आहे.

Action on illegal construction in Ulhasnagar | उल्हासनगरात अवैध बांधकामावर धडक कारवाई

उल्हासनगरात अवैध बांधकामावर धडक कारवाई

Next

उल्हासनगर : महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत अवैध बांधकामे  जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने सुरू होती, यांची खमंग चर्चा शहरात सुरु झाली आहे.
उल्हासनगरात काही दिवसापासून पक्की बहुमजली अवैध बांधकामे सर्रासपणे सुरू होती. महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, भूमाफिया आदींच्या बांधकामाला आशीर्वाद असल्याचे बोलले जात होते. अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या पथकाने शहरातील कैलास कॉलनी, शक्ती मार्केट, आस्था हॉस्पिटल आदी ठिकाणची बांधकामे जमीनदोस्त केली. तसेच पाडकाम सुरूच ठेवण्याचे संकेत शिंपी यांनी दिली आहे.  प्रभाग अधिकारी अजित गोवारी, दत्तात्रय जाधव व भगवान कुमावत यांची नावे चर्चेत येऊन, अधिकाऱ्याच्या सहमती विना ही बांधकामे उभी राहणे शक्य नसल्याचे बोलले जाते. आयुक्तांनी संबंधित प्रभाग अधिकारी, बिट निरीक्षक, मुकादम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील कॅम्प नं -५ दूध नाका, तहसील कार्यालय परिसर, डॉल्फिन हॉटेल ते शांतीनगर रस्ता, लालचक्की, कल्याण-अंबरनाथ रस्ता,  मुरबाड रस्ता आदी ठिकाणच्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  आयुक्त यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Action on illegal construction in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.