भिवंडीत बेकायदा बांधकामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:20+5:302021-03-04T05:16:20+5:30
भिवंडी : भिवंडीत मोठ्या संख्येने बेकायदा बांधकामे उभी राहिली असून याबाबत प्रशासकीय यंत्रणा सोबतच न्याय यंत्रणेनेही अनेकवेळा या बांधकामासंदर्भात ...
भिवंडी : भिवंडीत मोठ्या संख्येने बेकायदा बांधकामे उभी राहिली असून याबाबत प्रशासकीय यंत्रणा सोबतच न्याय यंत्रणेनेही अनेकवेळा या बांधकामासंदर्भात ताशेरे ओढले आहे. मात्र असे असतानाही आजही शहरात ठिकठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू असून सोमवारी एका बेकायदा बांधकामावर कारवाई करीत प्रशासनाने आर एम सी वाहन जप्त करून मुख्यालयात आणले आहे.
बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई करावी असे आदेश मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले असून मागील आठवड्यात रविवारी शहर विकास पथकाने अशा बांधकामावर कारवाई करीत यंत्रसामग्री जप्त करण्याची घटना ताजी असताना सोमवारी प्रभाग समिती एक अंतर्गत नागाव येथे सागर प्लाझा हॉटेलसमोर विकासक मोहम्मद अन्वर मो अतहर व मो अनजर मो अतहर या दोघांनी मिळून बेकायदा बांधकाम सुरू केले असून त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सोमवारी सुरू असल्याचे समजताच प्रभाग समिती क्रमांक एकचे सहायक आयुक्त दिलीप खाने, शहर विकास विभाग प्रमुख साकीब खर्बे व बीट निरीक्षक विराज भोईर यांनी घटनास्थळी धाव घेत त्या ठिकाणी काँक्रिट मिक्सर करणारे आर एम सी मशीन वाहन जप्त करून ते महापालिका मुख्यालयात आणून ठेवले आहे.