मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई
By Admin | Published: July 4, 2017 05:20 AM2017-07-04T05:20:46+5:302017-07-04T05:20:46+5:30
मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या उल्हासनगरातील एका हॉटेलसह कल्याणच्या नेवाळीतील गावठी दारूच्या हातभट्टीवर राज्य उत्पादन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या उल्हासनगरातील एका हॉटेलसह कल्याणच्या नेवाळीतील गावठी दारूच्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. उल्हासनगरमधून चौघांना अटक केली असून नेवाळीतून दोन लाखांचे सहा हजार लीटर रसायन जप्त केले आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाचे उपायुक्त टी.आर. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एस.आर. लाड, दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटणे यांच्या पथकाने रविवारी रात्री. सोमवारी पहाटे उल्हासनगर क्रमांक-२ हॉटेल ‘सी हॉक’ येथे कारवाई केली. येथे बेकायदेशीरपणे लेडिज बार सुरू होता. मद्यविक्री केली जात होती. या कारवाईत पाच बॉक्समधील १३ हजार ६४६ रुपयांच्या विदेशी मद्याच्या २७ बॉटल्स जप्त केल्या आहेत. तर, धनंजय शेलार, दिनेश पुजारी, राजेश गौडा आणि अनिल रजाक या चौघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नाना पाटील,यांच्या पथकाने कल्याणच्या नेवाळी-द्वारली रस्त्यावर गावठी दारूनिर्मितीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यात गावठी दारूनिर्मितीचे सहा हजार लीटर रसायन जप्त करून नष्ट केले.