उल्हासनगर महापालिकेची पानटपऱ्यावर कारवाई; अतिक्रमण हटवले, ७ हजार दंड वसूल
By सदानंद नाईक | Published: June 28, 2024 05:28 PM2024-06-28T17:28:01+5:302024-06-28T17:28:09+5:30
तंबाखूजन्य पदार्थ ठेवणाऱ्या पान टपऱ्यावर दंडात्मक ७ हजार रुपयांची कारवाई सुरू केली. तसेच कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर : अँपल व एंजल ऑर्केस्ट्रा व बारवर गुरवारी महापालिकेने धडक करवाई केल्यानंतर शुक्रवारी तंबाखू, पान, सिगारेट विकणाऱ्या ११ अवैध पानटपऱ्यावर अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली. तसेच ७ हजाराचा दंडही वसूल केला असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगर पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी बार व ऑर्केस्ट्रा मधील अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले. त्यानंतर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशान्वये एंजल व अँपल ऑर्केस्ट्रा बारवर गुरवारी अतिक्रमण विभागाने पोलीस संरक्षणात धडक कारवाई केली. तसेच इतर ऑर्केस्ट्रा व बारला पत्र देऊन अवैध बांधकामाची तपासणी करण्याचे संकेत दिले.
शुक्रवारी तंबाखू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ११ विनापरवाना पान टपऱ्यावर अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात कारवाई केली. तसेच ही पुणे शहराच्या धर्तीवर सुरूच राहण्याचे संकेत शिंपी यांनी दिली. तंबाखूजन्य पदार्थ ठेवणाऱ्या पान टपऱ्यावर दंडात्मक ७ हजार रुपयांची कारवाई सुरू केली. तसेच कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले.