भिवंडीत केमिकल गोदामांवर कारवाई ; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By नितीन पंडित | Published: February 23, 2023 05:29 PM2023-02-23T17:29:45+5:302023-02-23T19:24:54+5:30
तालुक्यातील राहनाळ,पुर्णा,वळ, गुंदवली,काल्हेर या पट्ट्यातील गोदामांमधून मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील रासायनिक पदार्थ साठविल्याच्या तक्रारी मागील कित्येक वर्षे होत आहेत.
भिवंडी - तालुक्यातील राहनाळ,पुर्णा,वळ, गुंदवली,काल्हेर या पट्ट्यातील गोदामांमधून मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील रासायनिक पदार्थ साठविल्याच्या तक्रारी मागील कित्येक वर्षे होत आहेत. परंतु या साठ्यांवर नक्की कारवाई करायची कोणी ? या बाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.असे असताना भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी अशा पदार्थांची साठवणूक करणाऱ्या गोदाम चालकांवर कारवाई केली आहे.
पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत जे.डी.एस गाळा क्रमांक १३ व १४ येथे गोदाम मालक जयंतीभाई शहा रा.घाटकोपर व इतर यांनी आपल्या गोदामात अनधिकृत केमिकलची साठवणूक केली होती.या गोदामावर पोलिसांनी कारवाई करून १५ लाख ७२ हजार ७९० रुपये किमतीचा १५७ प्लास्टीक ड्रम २४० कार्बो,११०बॅग हा साठा गोदामाबरोबरच दोन आयशर टेम्पो मध्ये भरलेला साठा आढळून आल्याने नारपोली पोलिसांनी कारवाई करीत रासायनिक पदार्थांच्या साठ्यासह दोन टेम्पो असा एकूण ३१ लाख ७२ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी भिवंडी नियंत्रण कक्षातील सहा पो निरी विजय कोळी यांनी दिलेल्या तक्रारी वरून गोदाम मालका विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे .