उल्हासनगरातील पान टपऱ्यावर कारवाई, ६ जणांना अटक, गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

By सदानंद नाईक | Published: November 10, 2023 05:40 PM2023-11-10T17:40:53+5:302023-11-10T17:42:34+5:30

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली. 

Action on pan stall in Ulhasnagar, 6 people arrested, Gutkha, aromatic tobacco seized | उल्हासनगरातील पान टपऱ्यावर कारवाई, ६ जणांना अटक, गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

उल्हासनगरातील पान टपऱ्यावर कारवाई, ६ जणांना अटक, गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

उल्हासनगर : शहरात गुटखा, सुगंधित सुपारी, पानमसाला आदी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरवारी दुपारी धडक कारवाई केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली. 

उल्हासनगरातगुन्हेगारीच्या संख्येत वाढ होऊन, पानटपऱ्यावर गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट सुपारी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. गुरवारी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी अरफना जगन्नाथ विरकायदे यांनी पथकासह शहरातील विविध ठिकाणच्या एकून ६ पान टपरीवर धाड टाकून तंबाखूजन्य गुटक्याचा साठा जप्त केला. अर्जुनकुमार विंदावन तिवारी, अनिल भारत शाहू, दिपकलाल दयालदास अडवाणी, सुरेश शिवाजी मोरे, अमोद भगवानदास मोर्या व कमलेश कुमार तिवारी या पानटपरी चालकांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक झाली. ऐन दिवाळी पानटपऱ्यावर कारवाई झाल्याने, नागरिकांनी आनंद व्यक्त केला. 

शहरात गेल्या आठवड्यात लाखो किमंतीचा गुटखा जप्त केला होता. पानटपऱ्या व दुकानावर सर्रासपणे गुटखा मिळत असून अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रत्येक पानटपरीवर धाड टाकल्यास गुटखा, सुगंधी गुटखा, पानंमसाला आदींचा मोठा साठा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

मिठाई दुकानावर कारवाई कधी? 

शहरात प्रसिद्ध मिठाई बाजार असून शेजारील व्यापारी व नागरिक मिठाई घेण्यासाठी येतात. बनावट खवा व इतर मिठाईची चर्चा शहरात असून अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे मोर्चा वळवावा. असे बोलले जात असून बनावट खव्याच्या मिठाईचा साठा मिळून येणार आहे.

Web Title: Action on pan stall in Ulhasnagar, 6 people arrested, Gutkha, aromatic tobacco seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.