वीजचोरांना झटका, टोरंट पॉवरने दाखल केले गुन्हे; वीज ताेडलेल्या ग्राहकांकडूनच हाेतेय चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 11:28 AM2023-05-27T11:28:49+5:302023-05-27T11:29:00+5:30

टोरंट कंपनीने नुकतीच मीटरमध्ये छेडछाड आणि वीज चोरीविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

action on power thieves, cases filed by Torrent Power; Charges are received only from consumers who have been cut off | वीजचोरांना झटका, टोरंट पॉवरने दाखल केले गुन्हे; वीज ताेडलेल्या ग्राहकांकडूनच हाेतेय चाेरी

वीजचोरांना झटका, टोरंट पॉवरने दाखल केले गुन्हे; वीज ताेडलेल्या ग्राहकांकडूनच हाेतेय चाेरी

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध आता जाेरदार कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून अनेकदा आवाहन करूनही या भागातील ग्राहक नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे आता ही कारवाई सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या भागातील १५ हजारांहून अधिक घरे पीडी थकबाकीच्या नावाखाली बेकायदा वीज वापरत आहेत. अशा ग्राहकांनी त्यांची प्रलंबित पीडी  देय रक्कम भरून कायदेशीररीत्या वीज मीटर मिळवावेत, असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.  कायदेशीर जाेडणीसाठी या भागातील रहिवासी पुढे येत नाहीत.
सुमारे २१ हजार ५०० जाेडण्या शून्य किंवा त्याहून खूप कमी युनिट वापर दर्शवितात. यातील अनेकांचे मीटर सदोष असल्याचा किंवा मीटरमध्ये छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशा लोकांचे मीटर त्वरित बदलणे आवश्यक आहे. अशा वीजचोरांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. त्यांना लाइन ट्रिपिंग आणि नेटवर्क बिघाडाचा सामना करावा लागतो. 

टोरंट कंपनीने नुकतीच मीटरमध्ये छेडछाड आणि वीज चोरीविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून पोलिसांत वीजचोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाइमुळे आता वीजचाेरांचे धाबे दणाणले आहेत.

तीन वर्षे कारावास किंवा दंडाची तरतूद
वीजचोरी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करीत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. विद्युत कायदा, २००३  नुसार, वीजचोरी हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी  तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची तरतूद असल्याची माहिती कंपनीने दिली.

Web Title: action on power thieves, cases filed by Torrent Power; Charges are received only from consumers who have been cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.