रस्त्याच्या आड येणाऱ्या बांधकामावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:19+5:302021-07-14T04:45:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : मराठा सेक्शन रस्ता बांधणीच्या आड येणाऱ्या दुकाने व घरांवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : मराठा सेक्शन रस्ता बांधणीच्या आड येणाऱ्या दुकाने व घरांवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस सरंक्षणात पाडकाम कारवाई केली. त्यामुळे रस्ता बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून, सिमेंट रस्ता बांधण्यात येत आहे.
उल्हासनगर पूर्वेतील मराठा सेक्शन ते स्टेशन रस्ता बांधणीचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. मुख्य रस्त्याला जोडण्याच्या ठिकाणी काही दुकाने व घरे रस्ता बांधणीच्या आड येत होती. महापालिकेने घरे व दुकानांना नोटिसा देऊनही ते स्वतःहून हटवीत नसल्याने, सोमवारी दुपारी दुकाने व घरांवर पाडकाम कारवाई केली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात कारवाई केली. त्यामुळे आता रस्ता बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून, बांधण्यात येत असलेला रस्ता सिमेंट रस्त्यावर थेट बांधण्यात येत असल्याने निकृष्ट बांधकाम असल्याची टीका होत आहे. कोणत्या नियमात असे रस्ते बांधण्यात येतात, हे बांधकाम विभागासह महापौर, आयुक्तांनी स्थानिक नागरिक व शहरवासीयांना सांगावे, अशी चर्चाही सुरू आहे.