कारवाईमुळे विकासक विरुद्ध प्रशासन वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:17 AM2020-02-19T01:17:40+5:302020-02-19T01:17:45+5:30

अयोध्यानगरीतील भूखंड : जागा आरक्षित असल्याची रहिवासी, महापालिका अधिकाऱ्यांची माहिती

The action sparked a administration dispute against the developer | कारवाईमुळे विकासक विरुद्ध प्रशासन वाद पेटला

कारवाईमुळे विकासक विरुद्ध प्रशासन वाद पेटला

Next

डोंबिवली : पूर्वेकडील अयोध्यानगरीतील एका मोकळ््या भूखंडावर टाकण्यात आलेल्या पत्र्याच्या कम्पाउंडवरून नवा वाद उभा राहिला आहे. संबंधित भूखंडावर उद्यानाचे आरक्षण असल्याबाबतच्या दाखल झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवरून मंगळवारी केडीएमसीकडून पत्र्याचे कम्पाउंड तोडण्यात आले. दरम्यान आपल्या मालकीच्या जागेत टाकलेले कम्पाउंड कोणाच्या परवानगीने तोडले असा जाब विकासक सुभाष म्हात्रे यांनी महापालिकेचे ‘फ’ प्रभागाचे अधिकारी दीपक शिंदे यांना विचारला. त्यामुळे भूखंडावरून उदभवलेला वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षापासून संबंधित भूखंड हा मोकळा आहे. प्रामुख्याने हा भूखंड मैदान म्हणून खेळण्यासाठी तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी वापरला जातो. स्थानिक नगरसेवक महेश पाटील यांच्यावतीने या मोकळ््या भूखंडावर क्रि केटच्या मॅचही भरविल्या जातात. दरम्यान या भूखंडावर काही दिवसांपासून पत्रे लावून तो बंदीस्त केला होता. याला स्थानिक रहिवाशांनी हरकत घेत भूखंडावर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला. भविष्यात उद्यान राहणार नाही, अशी भीती व्यक्त करीत गैरसोयीकडे त्यांनी लक्ष वेधले. या भूखंडाच्या बचावासाठी अयोध्यानगरीतील सोसायटींमध्ये राहणाºया रहिवाशांनी ‘अयोध्या नगरी मैदान बचाव समिती’ स्थापन केली. या समितीच्या वतीने केडीएमसीला अतिक्रमण झाल्याबाबत तक्रार करण्यात आली. येथील शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनीही ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला. प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी शिंदे यांच्या पथकाने भूखंडाच्या चोहोबाजूने लावण्यात आलेले पत्र्याचे कंपाऊंड तोडण्याची कारवाई मंगळवारी सकाळी केली. आता या कारवाईवरून नवा वाद उभा राहीला आहे.

अधिकाºयांवर कायदेशीर कारवाईची मागणी
संबंधित भूखंड आपल्या मालकीचा असताना त्यावरील पत्रे हटविण्याची कारवाई कोणाच्या परवानगीने केली, असा जाब विकासक सुभाष म्हात्रे यांनी प्रभाग अधिकारी शिंदे यांना विचारला. प्रभाग कार्यालयात जाऊन म्हात्रे यांनी संबंधित कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. भूखंडावर कोणतेही आरक्षण नसून त्याठिकाणी कोणीही कब्जा करू नये म्हणून आठवडाभरापूर्वी पत्र्याचे कंपाऊंड उभारल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान महापालिकेकडे आलेल्या तक्रारीच्या आधारे प्रभाग अधिकारी शिंदे यांनी माझ्याशी चर्चा केली होती. तसेच माझ्या मालकी हक्काच्या जागेची कागदपत्रेही जमा करून घेतली. याउपरही कारवाई केल्याप्रकरणी शिंदे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.

अयोध्यानगरीमधील मोकळ््या भूखंडावर आरक्षण असून रहिवाशांच्या आलेल्या तक्रारीच्या आधारे केलेली कारवाई कायदेशीर आहे.
- दीपक शिंदे,
‘फ’ प्रभाग अधिकारी, केडीएमसी

अयोध्यानगरी येथील रहिवासी निलेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून विकासक सुभाष म्हात्रे आणि विकासक यांच्याविरोधात टिळकनगर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. आपल्याविरूद्ध खोटी तक्रार दिली असून मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.
 

Web Title: The action sparked a administration dispute against the developer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.