एपीएमसीची दहा कंटेनरवर कारवाई, आयात केलेल्या चवळीची माहिती लपविली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:04 AM2019-02-06T04:04:39+5:302019-02-06T04:04:56+5:30
एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली चवळी परस्पर गोडावूनमध्ये घेऊन जाणाऱ्या दहा कंटेनरवर दक्षता पथकाने कारवाई केली आहे. संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे.
नवी मुंबई : एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली चवळी परस्पर गोडावूनमध्ये घेऊन जाणाऱ्या दहा कंटेनरवर दक्षता पथकाने कारवाई केली आहे. संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे.
बाजार समिती कार्यक्षेत्रामध्ये विनापरवाना होणाºया व्यापारावर दक्षता पथकाने कारवाई सुरू केली आहे. नियमाप्रमाणे आयात होणाºया कृषी मालाची माहिती बाजार समितीला देणे संबंधित व्यापाºयांना बंधनकारक आहे. परंतु अनेक जण माहिती न देता परस्पर एमआयडीसीमधील गोडावूनमध्ये मालाची साठवणूक करत आहेत. २ फेब्रुवारीला प्रशासक सतीश सोनी व सचिव अनिल चव्हाण, विशेष कार्य अधिकारी बी. डी. कामिठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनाथ वाघ व हिंदूराव आळवेकर यांच्या पथकाने एमआयडीसीमध्ये कारवाई केली. संबंधित वाहन चालकाकडे कागदपत्रांची तपासणी केली असता कंटेनरमध्ये चवळीच्या १ हजार बॅग असल्याचे निदर्शनास आले. २५० मेट्रिक टन माल यामध्ये आढळला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ८० लाख १५ हजार एवढी आहे. संबंधितांनी बाजार समितीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यामुळे कारवाई करण्यात आली.
दक्षता पथकाने यापूर्वी एमआयडीसीमध्ये विनापरवाना वेलचीचा साठा करणाºयांवर कारवाई केली होती. नवीन वर्षामध्ये प्रथमच दहा कंटेनर पकडून त्यांच्याकडून बाजार फीपेक्षा तीनपट दंड वसूल केला आहे. शासनाने भाजीपाला, फळे, साखर व इतर अनेक महत्त्वाच्या वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होवू लागला आहे. यामुळे दक्षता पथकाने नियमनामध्ये असणाºया वस्तूंची मार्केट आवारातच विक्री होईल. आयात केल्या जाणाºया वस्तूंची माहिती प्रशासनाला दिली जाईल याविषयी माहिती घेण्यास सुरवात केली आहे. व्यापाºयांनीही नियमाप्रमाणे प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नियम तोडणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.