मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्या ११५ तळीरामांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 11:46 PM2021-08-09T23:46:14+5:302021-08-09T23:50:35+5:30

आषाढी अमावस्या अर्थात गटारी अमावस्या साजरी करण्याच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहने चालविणाºया ११५ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारी कारवाईचा बडगा उगारला. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाºया ४४ चालकांविरु द्ध मोटार वाहन कायदा कलम १८८ अन्वये कारवाई केली.

Action taken against 115 Talirams for driving under the influence of alcohol | मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्या ११५ तळीरामांवर कारवाई

ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेची मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेची मोहीम३६ ठिकाणी तपासणी

ठाणे : आषाढी अमावस्या अर्थात गटारी अमावस्या साजरी करण्याच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहने चालविणाºया ११५ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारी कारवाईचा बडगा उगारला. मद्यपींसोबत प्रवास करणाºया ४४ सह प्रवाशांवरही ही कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
कोरोनामुळे सध्या रेल्वे प्रवासाला बंदी आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक मोठया प्रमाणात होते. दरम्यान, रविवारी आणि आषाढी अमावस्या असा योग जुळून आल्यामुळे यादिवशी मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांची शक्यता लक्षात घेऊन ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांमधील १८ युनिटअंतर्गत ३६ नाक्यांवर तपासणी मोहीम राबविण्यात आली. मद्यपी वाहन चालकांमुळे अशा वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी तळीरामांवर करडी नजर ठेवली होती.याच तपासणी मोहिमेत ७ आणि ८ आॅगस्ट रोजी दोन दिवसांमध्ये ११५ मद्यपी वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्ह नियमाअंतर्गत कारवाई झाली. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाºया ४४ चालकांविरु द्ध मोटार वाहन कायदा कलम १८८ अन्वये कारवाई केली. ही कारवाई यापुढे देखील अशीच चालू राहणार असून मद्यपान करून वाहन न चालविण्याचे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.
* सर्वाधिक कारवाई मुंब्रा भागात-
मद्य प्राशन करुन वाहन चालविणाºया सर्वाधिक २० जणांविरुद्ध तर आठ सह प्रवाशांवरही कारवाई मुंब्रा युनिटने केली. त्यापाठोपाठ कल्याणमध्ये १२ तर उल्हासनगरमध्ये दहा जणांविरुद्ध कारवाई झाली. कळव्यात सहा सह प्रवाशांवर तर वागळे इस्टेट, कापूरबावडी आणि कोनगावात प्रत्येकी पाच सह प्रवाशांवर कारवाई झाली.

 

Web Title: Action taken against 115 Talirams for driving under the influence of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.