ठाण्यात संचारबंदी झुगारणाऱ्या ७७ वाहनांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:51 PM2020-05-31T23:51:34+5:302020-05-31T23:55:07+5:30

घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. असे असतानाही अनेकजण सर्रास वाहने घेऊन विनाकारण घराबाहेर पडतात. अशाच नियमांची पायमल्ली करणा-या ५५ रिक्षा आणि २२ दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने शनिवारी एकाच दिवसात कारवाईचा बडगा उगारला.

Action taken against 77 vehicles in Thane | ठाण्यात संचारबंदी झुगारणाऱ्या ७७ वाहनांवर कारवाईचा बडगा

वाहतूक शाखेची एकाच दिवसातील कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे वाहतूक शाखेची एकाच दिवसातील कारवाई५५ रिक्षा आणि २२ दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापही संचारबंदी असतांना सर्रास वाहने घेऊन बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. नियमांची पायमल्ली करणा-या ५५ रिक्षा आणि २२ दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने शनिवारी एकाच दिवसात कारवाईचा बडगा उगारला. अशी ७७ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. असे असतानाही अनेकजण सर्रास वाहने घेऊन विनाकारण घराबाहेर पडतात. यामध्ये अनेकजण वैद्यकीय कारणे देतात. यात पडताळणी केल्यावर मात्र अनेकांनी बाहेर पडण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे समोर येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील वागळे इस्टेट परिमंडळात वाहतूक पोलिसांनी ३० मे रोजी ५५ रिक्षा आणि २२ दुचाकी वाहने जप्त करीत दंडात्मक कारवाई केली. अशी कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी घरीच थांबण्याचे आवाहन वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी केले आहे. ठाण्यातील राबोडी, मुंब्रा आणि कळवा कळवा तसेच,भिवंडी,कल्याण आणि उल्हासनगरच्या काही भागांमध्ये राज्य राखीव दलासह, केंद्रीय शीघ्रकृती दलाच्या तुकडयाही तैनात केल्या आहेत. ठाण्याचा रेड झोनमध्ये समावेश असूनही अनेकजण संचारबंदीचे उल्लंघन करतात. रिक्षा व्यवसायालाही प्रतिबंध असताना बिनधास्तपणे रिक्षा वाहतुक सुरु असल्याने शनिवारी नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी सिग्नल या भागात ५५ रिक्षांसह ७७ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Action taken against 77 vehicles in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.