नियम तोडणाऱ्या  957 वाहन चालकांवर कारवाई: 195 वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 10:40 PM2020-06-28T22:40:29+5:302020-06-28T22:40:53+5:30

दुचाकीवरुन डबल सीट जाणाऱ्या157 जणांवर कारवाई

Action taken against 957 drivers for violating rules: 195 vehicles seized | नियम तोडणाऱ्या  957 वाहन चालकांवर कारवाई: 195 वाहने जप्त

नियम तोडणाऱ्या  957 वाहन चालकांवर कारवाई: 195 वाहने जप्त

Next

ठाणे: वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर यापुढे वाहतूकीचे नियम अधिक कडक केले जाणार आहे. संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात रविवारी दिवसभरात निमम तोडणाऱ्या 957 चालकांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला. तर 157 दुचाकींसह 195 वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रंनी दिली.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन क्षेत्रत 30 जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीस बंदी राहणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी तसेच कॅबमध्ये चालकासह तीन, रिक्षामध्ये तीन, चारचाकी वाहनांमध्ये तीन, दुचाकीवर फक्त एका व्यक्तीला प्रवासाला  परवानगी आहे. याव्यतिरिक्त वाहनांमध्ये अधिक प्रवासी संख्या असल्यास कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांनी याआधीच दिला आहे. तरीही दुचाकीवरुनही सर्रास डबलसीट प्रवास केला जातो.

याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील तीन हात नाका, जांभळी नाका, भिवंडी, उल्हासनगर, वागळे इस्टेट, कल्याण आणि डोंबिवली आदी भागामध्ये विविध पथकांनी वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या तब्बल 957 चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दुचाकीवरुन बिनधास्तपणो डबलसीट जाणाऱ्यां 157 दुचाकी, जादा प्रवासी नेणाऱ्या 35 रिक्षा आणि तीन मोटार कार अशी 195 वाहने जप्त केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेने दिली. 

Web Title: Action taken against 957 drivers for violating rules: 195 vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.