अवैध बांधकामावर कारवाई, उल्हासनगरमध्ये महिलेचा अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न
By सदानंद नाईक | Updated: February 24, 2025 18:48 IST2025-02-24T18:47:36+5:302025-02-24T18:48:16+5:30
उल्हासनगरच्या बंद डम्पिंग ग्राऊंडवरील अवैध बांधकामावर करण्यात आली पाडकाम कारवाई

अवैध बांधकामावर कारवाई, उल्हासनगरमध्ये महिलेचा अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-२, हनुमाननगर डम्पिंग ग्राऊंड येथील अवैधपणे बांधण्यात आलेल्या बांधकामावर महापालिकेने सोमवारी पाडकाम कारवाई केली. यावेळी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला तर ऐक महिला चक्क जेसीबी मशीन मध्ये बसण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगरात शेकडो अवैध बांधकामे सुरु असल्याची ओरड सुरु असताना, कॅम्प नं-२, हनुमाननगर डम्पिंग ग्राऊंड येथे अवैधपणे बांधलेला एकूण १० घराचा जोथा, ५ घरे व दोन झोपड्या यांच्यावर महापालिका अतिक्रमण पथकाने सोमवारी पाडकाम कारवाई केली. असी माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच पाडकाम कारवाई सुरूच राहण्याचे संकेत शिंपी यांनी दिले. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या अवैध बांधकामाचा शहरांत बोलबाला असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.