उल्हासनगर रेल्वे स्टेशन शेजारील झोपडपट्टीवर कारवाई महिलांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: April 5, 2025 18:33 IST2025-04-05T18:33:47+5:302025-04-05T18:33:56+5:30
स्मार्ट पार्किंग व परिवहन बस आगार भूखंडावरील झोपडपट्टीवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली.

उल्हासनगर रेल्वे स्टेशन शेजारील झोपडपट्टीवर कारवाई महिलांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : स्मार्ट पार्किंग व परिवहन बस आगार भूखंडावरील झोपडपट्टीवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली. यावेळी महिलांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी व सलोनी निमवर यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नागपूर शहराच्या धर्तीवर स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्यास सुरवात केली. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला महापालिका परीवहन बस आगाराचे काम सुरु असून त्या शेजारी स्मार्ट पार्किंग झोन सुरु करण्यात येणार आहे. मात्र भूखंडावर अवैधपणे उभारलेल्या झोपड्या अडसर ठरल्याने, शुक्रवार आयुक्तांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात व जेसीबी मशीनने कारवाई केली. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी सहायक आयुक्त शिंपी व सलोनी निमवर यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारले. पोलीस व महापालिका सुरक्षा रक्षकांनी महिलांना ताब्यात घेऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणले.
महिलांवर गुन्हा दाखल
रेल्वे स्टेशन भूखंडावरील झोपडपट्टीसह मासे मार्केटची काही दुकानेही महापालिका अतिक्रमण विभागाने हटविली. मात्र झोपडपट्टीतील काही महिलांनी दगडफेक करून अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. असी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. याठिकाणी लवकरच स्मार्ट पार्किंग सूरु होणार असून परिवहन बस आगारही कार्यान्वित होणार आहे.
शहाड पार्किंगला रेल्वेचा अडथळा
शहाड रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथे पार्किंगचा ठेका एका खाजगी ठेकेदाराला दिला. मात्र ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केले जाते, त्या पार्किंगच्या रस्त्यावर रेल्वे प्रशासनने अचानक लोखंडी खांब गाडले. त्यामुळे वाहने काढण्याने लावण्यात अडथळा निर्माण झाला. वाहतूक कोंडी समस्या निर्माण