उल्हासनगर महापालिकेची बेवारस वाहनावर कारवाई
By सदानंद नाईक | Published: April 30, 2024 06:23 PM2024-04-30T18:23:01+5:302024-04-30T18:23:32+5:30
११ वाहनावर कारवाई करून संबंधिताकडून १७ हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनावर महापालिका, वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी संयुक्तपणे कारवाई केली. ११ वाहनावर कारवाई करून संबंधिताकडून १७ हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला महिनोंमहिने बेवारस गाड्या उभ्या असल्याने, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत तक्रारी आल्यावर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार मंगळवारी बेवारस वाहनावर कारवाई सुरू झाली. त्यापूर्वी महापालिका अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी यांची बैठक झाली होती.
तिन्ही विभागाच्या संयुक्त कारवाईतून मंगळवारी ११ वाहनावर कारवाई झाली. तसेच संबंधिताकडून १७ हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. ही कारवाई सुरूच राहणार असून बेवारस वाहन आढळल्यास नागरिकांनी प्रभाग समिती कार्यालयात तक्रार करावी. अशी सूचना लेंगरेकर यांनी नागरिकांना केली आहे.