भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांवर केली कारवाई, नियमांचे केले सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:21 AM2017-10-16T06:21:39+5:302017-10-16T06:22:23+5:30

भार्इंदर पश्चिम भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेकायदा ३८ रिक्षा व चालकांविरोधात शनिवारी वाहतूक शाखा, भार्इंदर पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने मिळून कारवाई केली. यावेळी महिला परवाना असताना रंग बदलून पुरुष चालक चालवत

 Action taken by the rickshaw pullers in Bhinder, violations of norms | भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांवर केली कारवाई, नियमांचे केले सर्रास उल्लंघन

भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांवर केली कारवाई, नियमांचे केले सर्रास उल्लंघन

Next

 भार्इंदर : भार्इंदर पश्चिम भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेकायदा ३८ रिक्षा व चालकांविरोधात शनिवारी वाहतूक शाखा, भार्इंदर पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने मिळून कारवाई केली. यावेळी महिला परवाना असताना रंग बदलून पुरुष चालक चालवत असलेली रिक्षा जप्त करण्यात आली. ‘लोकमत’मध्ये भार्इंदर पश्चिम भागात चालणा-या बेकायदा रिक्षांचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
भार्इंदर पश्चिम भागात महिलांसाठी मंजूर असलेल्या रिक्षा परवान्यांच्या नावाखाली अबोली रंग बदलून काळा पिवळा केला जात होता. पुरुषच महिला परवान्यांच्या नावाखाली रिक्षा चालवत होते. या शिवाय परवाना, बॅज नाही, आवश्यक परवाना नाही, स्क्रॅपमधील जुन्या रिक्षा चालवणे, बाहेरच्या परमीटच्या रिक्षा चालवणे आदी बेकायदा प्रकार सर्रास चालत होते. ‘लोकमत’ मध्ये वृत्त येताच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चालणाºया रिक्षा व चालकांवर कारवाईचे आदेश दिले होते.
या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागासोबत वाहतूक पोलीस व भार्इंदर पोलिसांनी मिळून शनिवारी कारवाई केली. मोठा ताफा व कारवाईची माहिती मिळताच अनेक रिक्षाचालक गायब झाले. वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश शिंदे, भार्इंदरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, मोटार वाहन निरीक्षक भरत जाधव व कलबीर सिंग यांच्यासह वाहतूक पोलीस व भार्इंदर पोलीस सहभागी झाले होते.
या वेळी मोठ्या संख्येने रिक्षाचालक जमा झाले होते. या तपासणीमध्ये महिला परवाना असताना अबोली रंग बदलून काळा - पिवळा रंग करून पुरुष चालवत असलेली रिक्षा जप्त करण्यात आली. आठवड्याभरापूर्वी केलेल्या कारवाईतही अशा प्रकारच्या तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या होत्या असे शिंदे म्हणाले.
वाहतूक व भार्इंदर पोलिसांनी मिळून २३ केस तर प्रादेशिक परिवहन विभागाने १५ अशा एकूण ३८ केस केल्या. यामध्ये परवाना, बॅज नाही, आदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी या केसेस केल्याचे कांबळे म्हणाले.

Web Title:  Action taken by the rickshaw pullers in Bhinder, violations of norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस