राज्य उत्पादन शुल्क विभागाची खर्डीत कारवाई

By admin | Published: July 6, 2017 09:31 PM2017-07-06T21:31:10+5:302017-07-06T22:19:37+5:30

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गुरुवारी पाचव्या दिवशीही सुरुच होती. अंबरनाथ पाठोपाठ दिव्यातील खर्डी गावातील खाडी

The action taken by the state excise department | राज्य उत्पादन शुल्क विभागाची खर्डीत कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची खर्डीत कारवाई

Next
>ऑनलाइन लोकमत 
ठाणे, दि.06 - गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गुरुवारी पाचव्या दिवशीही सुरुच होती. अंबरनाथ पाठोपाठ दिव्यातील खर्डी गावातील खाडी परिसरातील बेकायदेशीर दारु अड्डयांवर कारवाई करुन या पथकाने एका होडीसह गावठी दारु असा 88 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त केला.
    खर्डीतील खाडी किनारी गावठी दारु निर्मितीचा अड्डा सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांना मिळाली होती. तिच्या आधारे भरारी पथकाचे निरीक्षक एस. आर. लाड, दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटणे, डी. वाय. शिर्के आदींच्या पथकाने गुरुवारी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजताच्या समारास याठिकाणी धाडसत्र राबविले. यात गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे 500 लीटर रसायन, एक हजार लीटरचे बॉयलर, 36 प्लास्टीकचे बॅरल, 420 लीटर गावठी दारु, 12 प्लास्टिकचे डबे, एक फायबरची बोट असा सुमारे 88 हजार 9क्क् रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. होडी वगळता उर्वरित मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती सूत्रंनी दिली. बेकायदेशीर दारुची विक्री आणि वाहतूकीवर यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असल्याचे लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या कारवाईच्या वेळीही भट्टी चालविणारे मात्र पसार झाल्यामुळे कोणीही आरोपी या पथकाच्या हाती लागले नाही.

Web Title: The action taken by the state excise department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.