उल्हासनगर महापालिकेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:46 AM2019-11-03T00:46:38+5:302019-11-03T00:46:52+5:30
रेल्वेस्टेशन परिसरातील भूखंड मोकळा । पोलीस बंदोबस्तामध्ये हटवल्या झोपड्या, स्टॉल
उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पश्चिम) परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रम करण्यात आले आहे. या भूखंडावरील झोपड्या, स्टॉल आणि टपऱ्यांवर महापालिकेच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने ही कारवाई करून अतिक्रमण हटवले.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर केलेल्या या कारवाईत ५० झोपड्या, २० स्टॉल आणि ८ टपºया आदी अतिक्रमणे दूर करण्यात आली आहेत. रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणांबाबतही आयुक्तांनी इशारा दिला आहे. उल्हासनगर कॅम्प नं. ३ येथील रेल्वे स्टेशनशेजारील आरक्षित भूखंडावर झोपड्या, लोखंडी स्टॉल, टपºया बांधण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले होते. याठिकाणी पालिकेने यापूर्वीही कारवाई केली होती. मात्र कारवाई केल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा बेकायदे बांधकामे उभ्या राहिल्या होत्या. याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतर त्यांनी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शिंपी यांनी शनिवारी ही कारवाई केली.
शिंपी यांच्या अतिक्र मण पथकाने पोलीस संरक्षणात झोपड्यांवर धडक कारवाई केली. एकाच वेळी ५० झोपड्या, २० स्टॉल आणि आठ टपºया तोडण्यात आल्याचे शिंपी यांनी सांगितले. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी स्वत: उभे राहून धडक कारवाई केली असून या कारवाईने अतिक्रमणधारकात धडकी भरली आहे. मात्र या कारवाईत सातत्य न राहिल्यास पुन्हा त्याच जागी बांधकामे उभी राहण्याची शक्यता आहे.
रस्त्यांवरील अतिक्रमणेही हटवण्याची नगरसेवकांची मागणी
शहरातील इतर पालिका भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच बहुतांश रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यावरही पालिकेने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवक करीत आहेत. रेल्वे स्टेशनकडे येणारा वालधुनी नदीवरील पूल नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्याची मागणी यानिमित्ताने
केली जात आहे.