अडीच हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:50 AM2017-08-03T01:50:17+5:302017-08-03T01:50:17+5:30
वाहतुकीस अडथळा आणणाºया वाहनांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. जुलैमध्ये अडीच हजार वाहनांवर कारवाई करताना पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला.
अनिकेत घमंडी ।
डोंबिवली : वाहतुकीस अडथळा आणणाºया वाहनांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. जुलैमध्ये अडीच हजार वाहनांवर कारवाई करताना पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर, बुधवारी कल्याण आरटीओ आणि वाहतूक विभागाने संयुक्त कारवाईत १२० रिक्षांची तपासणी केली. त्यात १० रिक्षा बोगस आढळल्याने त्या आरटीओने जप्त केल्या.
कल्याण आरटीओचे अधिकारी संजय ससाणे आणि शहर वाहतूक पोलीस अधिकारी गोविंद गंभीरे यांच्या पथकांनी डोंबिवलीत सकाळपासूनच रिक्षा आणि रिक्षाचालकांची कसून तपासणी केली. त्यात पूर्वेला इंदिरा गांधी चौक आणि महात्मा फुले रोडवरील १२० रिक्षांची पाहणी करण्यात आली. त्यात १० रिक्षा बोगस आढळल्या.
त्यामुळे त्या कल्याणला आरटीओ कार्यालयाच्या परिसरात हलवल्याचे गंभीरे यांनी सांगितले. वाहन चालवण्याचा परवाना, बॅज नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. तर, मुदत संपलेल्या रिक्षा जप्त केल्याचे गंभीरे पुढे म्हणाले.
जुलैमध्ये दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा अशा दोन हजार ५८९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. दोषींकडून पाच लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. वाहतूक विभागाची कारवाई सुरूच
असते. त्याला आरटीओ अधिकाºयांनीही साथ दिली, असे गंभीरे म्हणाले. सतत कारवाईचा बडगा उगारल्यास वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळतील. दरम्यान, रिक्षाचालकांना शिस्त लागण्यासाठी अशी कार्यवाही आवश्यक असल्याचा विश्वास आरटीओ अधिकाºयांनी व्यक्त केला.