अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई दुस-या दिवशीही सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 08:32 PM2017-09-28T20:32:08+5:302017-09-28T20:33:02+5:30
ठाणे - सलग दुस-या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई सुरुच होती. दुस:या दिवशी पालिकेने शीळ - दिवा परिसरात कारवाईनंतरही नव्याने सुरु करण्यात आलेले दोन बार, सहा हुक्का पार्लरलसह ओवळा येथील चक्रीका लॉज तोडण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडय़ातही आम्रपाली तर वागळेतील सिझर पॅलेस सील करण्यात आले. बुधवारी चार बारवर कारवाई केल्यानंतर गुरुवारी सकाळी सकाळी नौपाडा, वागळे, माजिवडा, कळवा, मुंब्रा आणि शीळ-दिवा या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ओवळा येथील चक्रीका लॉजच्या पहिल्या व दुस:या मजल्यावरील बांधकाम तोडून टाकण्यात आले. तर शीळ-दिवा परिसरातील ट्वेंटी-ट्वेटी लेडीज बारसह, शुभम आणि सुनील हे दोन बार तोडून टाकण्यात आले. तर नौपाडा येथील आम्रपाली आणि वागळे येथील सिझर पॅलेस हा लेडीज बार सील करण्यात आला. दरम्यान शीळ-दिवा परिसरातील एक आणि कळव्यातील तीन हुक्का पार्लरवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली.