भाजपच्या 'त्या' अनधिकृत होर्डिंगवर अखेर पालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 08:02 PM2018-09-30T20:02:02+5:302018-09-30T20:03:03+5:30

सिल्वर पार्क नाक्यावर असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर त्याच्या दर्शनी भागात भाजपाचे भले मोठे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते.

action on the unauthorized hoarding of BJP | भाजपच्या 'त्या' अनधिकृत होर्डिंगवर अखेर पालिकेची कारवाई

भाजपच्या 'त्या' अनधिकृत होर्डिंगवर अखेर पालिकेची कारवाई

googlenewsNext

मीरारोड : मीरारोडच्या सिल्वर पार्क नाक्यावरील वादग्रस्त ठरलेल्या भाजपाच्या अनधिकृत होर्डिंगवर अखेर महापालिकेने तोडक कारवाई केली. या विरोधात अनेक तक्रारी झाल्या होत्या.


सिल्वर पार्क नाक्यावर असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर त्याच्या दर्शनी भागात भाजपाचे भले मोठे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते. सदर होर्डिंगवर नेहमी भाजपाच्या जाहिराती लागत होत्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष अमित शाह यांच्यासह आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता, नगरसेवक अरविंद शेट्टी, पदाधिकारी फिरोज शेख, संजय थरथरे आदींची छयाचित्रे असायची.


भाजपा नेत्यांपेक्षा लॉज - बार चालवणाऱ्यांच्या पंक्तीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्र टाकल्याच्या विरोधात विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणी भाजपा नगरसेवक अरविंद शेट्टीवर अदखल पात्र गुन्हा मीरारोड पोलिसांनी नोंदवला होता. तसेच त्याचे फलक काढण्यास लावले होते.


तर सदर अनधिकृत होर्डिंग बेकायदा लोखंडी फ्रेम उभारून भाजपा वापरत असल्याने त्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. पालिका कारवाई करत नसल्याने अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी थेट शासना पर्यंत केली होती. अखेर शनिवारी प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या आदेशानंतर सदरची बेकायदा होर्डिंग काढून टाकली. 
 

Web Title: action on the unauthorized hoarding of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.