सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा
By नितीन पंडित | Published: April 5, 2024 05:16 PM2024-04-05T17:16:45+5:302024-04-05T17:17:32+5:30
भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे.
नितीन पंडित,भिवंडी:भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या आर के लॉजी वर्ल्ड या गोदाम संकुलावर एम एम आर डी ए कडून कोणतीही नोटीस न बजावता कारवाई करण्याचा घाट घालण्यात आला.
सुरेश म्हात्रे यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून येवई येथे आर के लॉजी पार्क नावाने गोदाम संकुल उभारले आहे .या बांधकामावर गुरुवारी सायंकाळी कोणतीही नोटीस न बजावता सिल करण्याच्या कारवाईसाठी एम एम आर डी ए चे अधिकारी पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले.यावेळी सुरेश म्हात्रे यांच्या भागीदार सहकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतली असल्याची माहिती दिली त्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेले एमएमआरडीएचे अधिकारी रित्या हाती माघी परतले.
मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील यांनीच घातली आहे, असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.एम एम आर डी ए राजकीय दबावातून कारवाई करीत असून जिनके घर शिसेके होते है ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते अशा शब्दात सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला असून निवडणूक लढतांना समोरासमोर येऊन लढा अशा कारवाया करून पाठीत खंजीर खुपसल्यासारखे नका करू असा इशारा म्हात्रे यांनी कपिल पाटलांना दिला आहे.