नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्यांवर होणार कारवाई
By अजित मांडके | Published: February 8, 2023 04:59 PM2023-02-08T16:59:57+5:302023-02-08T17:01:46+5:30
पालकमंत्री शुंभेराजे देसाई यांनी दिले कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अधिकारी गैरहजर राहत असल्याने त्याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे. क्लार्क आणि कनिष्ठ अधिका:यांना नियोजन बैठकीला पाठवून अधिकारी सुट्टीवर गेल्याची गंभीर बाब यावेळी पुढे आली. त्यामुळे अशा अधिका:यांना कारणो दाखवा नोटीस बजावण्यात यावी असे आदेश देसाई यांनी जिल्हाधिका:यांना दिले. तसेच तरीसुध्दा त्यांनी योग्य उत्तर दिले नाही तर त्यांना माङया दालनात घेऊन येण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बुधवारी नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आर्थिक वर्ष संपत येत असल्याने आलेल्या निधीचा विनियोग कोणत्या पध्दतीने झाला, विविध विभागांकडून करण्यात येत असलेली कामे कुठ र्पयत आली. याचा आढावा घेतला जात होता, त्यानुसार काही कामांच्या बाबतीत अनेक अधिका:यांना योग्य उत्तरे देता आली नाही, निधी देऊनही कामांना स्थगिती कशी दिली जाते, कोणी स्थगिती दिली यावरुन जिल्हा क्रिडा विभागाला देसाई यांनी चांगलेच धारेवर धरले. मात्र त्यांच्या प्रश्नांची देखील योग्य उत्तरे क्रिडा अधिका:यांना योग्य पध्दतीने देता आली नाही. तंत्र शिक्षण विभागाच्या बाबतीत चर्चा सुरु असतांना या विभागाचे प्रमुख अधिकारी हे सुट्टीवर गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बैठकीला या विभागाचे क्लार्क हजर राहिल्याने देसाई यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्यातही मंत्र्यांना कामांची माहिती देताना योग्य माहिती न मिळाल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. त्यातही मंजुर निधीतील कोटय़ावधींचा निधी पडून असल्याचेही त्यांच्या निर्दशनास आले. त्यावरुन देखील त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
त्यातही ग्रामीण भागातील सोनावळे येथील आरोग्य केंद्राच्या कामाच्या स्थितीचा आढावा घेत असतांना अधिका:यांनी चुकीची आणि दिशाभुल करणारी माहिती दिल्याने त्यावरुन देखील देसाई चांगलेच संतापल्याचे दिसून आले. त्यातही येथील काम आता कुठे सुरु झाले असतांना ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचा दावा संबधींत अधिका:याने केल्याने देखील उपस्थित आमदारांनी त्यांच्या या उत्तराची पोलखोल केली.
त्यातही अधिकारी कामात गती देत नसल्याने विकास कामे रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कामांना उशीर झाला तर संबधींत अधिका:यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान गैरहजर राहणा:या अधिका:यांना तत्काळ कारणो दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिका:यांना दिले असून तरी देखील हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना पालकमंत्र्यांसमोर हजर करा असे निर्देशही त्यांनी दिले.