सीआरझेड बफर झोनमधील बांधकामांवर होणार कारवाई, आयुक्तांनी केली समिती गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 07:02 PM2018-10-08T19:02:34+5:302018-10-08T19:05:02+5:30
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सीआरझेड बफर झोन मधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही कारवाई अपेक्षित धरण्यात आली आहे.
ठाणे - ज्या ठिकाणी खारफुटीचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी ५० मीटर या ना बांधकाम क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पाशर््वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच ज्या ठिकाणी खारफुटीचे क्षेत्रफळ एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी ५० मीटरच्या ना बांधकाम क्षेत्रात जी बांधकामे उभी राहिली आहेत त्या बांधकामावर कारवाई करून ते क्षेत्र २००५ रोजीच्या स्थितीत आणण्याचे आदेश दिले होते. त्या पाशर््वभूमीवर सोमवारी महापालिका आयुक्त आयुक्तांनी त्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. या समीतीमध्ये उपायुक्त(जनसंपर्क), उपायुक्त (अतिक्र मण), शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र भेंडाळे आदींचा समावेश आहे. कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने ही समिती कामकाज करेल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सद्यस्थितीत महापालिका हद्दीची सॅटेलाईट प्रतिमा तयार करून आजची परिस्थिती आणि २००५ रोजीची स्थिती यामध्ये असलेल्या तफावतीचा आढावा घेणे, खारफुटीच्या क्षेत्राचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करणे, त्या ठिकाणी अतिक्र मणे होवू नयेत म्हणून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याबाबत संबंधित विभागास कळविणे, ज्या ठिकाणी खारफुटीची कत्तल झाली आहे त्या प्रकरणी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करणे, खारफुटीची कत्तल रोखण्यासाठी तक्र ार निवारण प्रणाली तयार करणे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे खारफुटी व्याप्त क्षेत्र वन विभागास हस्तांतरित करणेबाबतही त्यांनी सुचित केले आहे. तसेच सद्य स्थितीची पाहणी करून खारफुटी क्षेत्राचे नकाशे तयार करण्याची कार्यवाही करावी. हे नकाशे प्राप्त झाल्यानंतर ते क्षेत्र २००५ सालच्या पूर्वस्थितीमध्ये आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.