गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे 

By नितीन पंडित | Published: August 25, 2022 08:21 PM2022-08-25T20:21:51+5:302022-08-25T20:22:21+5:30

पोलीस म्हणजे वेगळे काही नसते, प्रत्येक व्यक्ती हा गणवेश नसलेला पोलीस होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी कान व डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे - कराळे

Activists of Ganeshotsav Mandal should cooperate with the police from the role of the police Dattatray Karale | गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे 

गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे 

googlenewsNext

नितीन पंडित 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून सहकार्य केल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा फक्त बंदोबस्त न करता गणेशोत्सवाचा आनंद घेता येईल असे प्रतिपादन ठाणे शहर पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले. बुधवारी ते भिवंडीत सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी भिवंडी महानगरपालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ ,पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण,भिवंडी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष मदन भोई, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके,प्रशांत ढोले व्यासपीठावर उपस्थित होते .

पोलीस म्हणजे वेगळे काही नसते,प्रत्येक व्यक्ती हा गणवेश नसलेला पोलीस होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी कान व डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. संवेदनशील भिवंडी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात सर्व धर्मीय एकत्रित येऊन सण उत्सव साजरे करतात हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असा विश्वासही यावेळी दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सव शहरवासीयांना आनंदात साजरा करता यावा यासाठी पालिका प्रशासन सज्ज असून, रस्त्यावरील खड्डे भरणे, पथदिवे सुरू ठेवणे, विसर्जन घाट स्वच्छ करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सांगितले. तर दोन वर्षे कोरोना काळात सर्व सण उत्सव निर्बंधात साजरे होत असताना शासनाने निर्बंध हटविले म्हणून सर्वांनी बेधुंद होऊन सण साजरा न करता समाजभान बाळगून उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी नागरिकांना केले.  

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मधील स्पर्धे मध्ये जयभारत व्यायामशाळा पद्मानगर गणेशोत्सव मंडळास प्रथम, धामणकर नाका मित्र मंडळ व युवा मित्र मंडळ खोणी यांना विभागून द्वितीय क्रमांक,श्री गणेश मित्र मंडळ नाईकवाडी कोनगाव व स्वामी समर्थ मित्र मंडळ चौधरी कंपाऊंड कामतघर यांना विभागून तृतीय क्रमांक, बाळ गोपाळ मित्र मंडळ साईप्रसन्न सोसायटी नारपोली यांना विशेष उल्लेखनीय ,जयहिंद मित्र मंडळास सुबक मूर्ती,गौरीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास सुंदर सजावट व जय गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा यांना पर्यावरण संदेश जनजागृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

Web Title: Activists of Ganeshotsav Mandal should cooperate with the police from the role of the police Dattatray Karale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.