अभिनेते सुबोध भावेंच्या उपस्थित रंगणार ठाण्यातील ४०० वा विक्रमी अभिनय कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 04:27 PM2018-10-25T16:27:26+5:302018-10-25T16:30:17+5:30
गेली ०८ वर्ष सातत्याने एक "नाट्य चळवळ" म्हणून काम करणाऱ्या अभिनय कट्ट्याचा ४०० वा कट्टा साजरा होत आहे.
ठाणे : कलाकारांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अभिनय कट्टयावर सलग १२ तासांचे विक्रमी सादरीकरण होणार आहे. सुबोध भावे यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपास्तिथी लावणार आहेत. या विक्रमी कट्टयावर अभिनय कट्ट्याच्या कलाकारांतर्फे दर्जेदार सादरीकरण होणार आहेत.
२८ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत हा विक्रमी कट्टा साजरा होणार आहे. कट्ट्याचे उदघाटन जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर,सिने अभिनेते मंगेश देसाई, आयकर विभाग उपायुक्त योगेंद्र वखारे यांच्या हस्ते होणार आहे.तसेच पुरुषोत्तम बेर्डे, कुमार सोहोनी, अभिजीत चव्हाण, रवी जाधव, ऋता दुर्गुले, विजू माने, भूषण तेलंग, आशिष जोशी, लोकेश गुप्ते, विजया वाड इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपास्तिथी असणार आहे. दिव्यांग कला केंद्राचे विद्यार्थी "नमन" सादर करुन कार्यक्रमास सुरवात करतील. बालझूबड या कार्यक्रमात अभिनय कट्ट्याचे बाल संस्कार शास्त्रातील विद्यार्थी नृत्य,नाटक सादर करतील.अरुण साधू यांच्या "झिपऱ्या" या कादंबरीचे अभिवाचन राजश्री गडीकर आणि अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती करणार आहेत. अवनी वाघिणीच्या बाचावार्थ "अवनी मोर द्यान टायगर्स" या स्कीटचे सादरीकरण होईल. अभिनय कट्ट्याचा कलाकार स्व.संकेत देशपांडे याच्या स्मरणार्थ "बाप गेला रे बाप गेला"हि एकांकिका सादर होणार आहे. संकेत देशपांडे लिखित "अकबर बिरबल" द्वीपात्रीचे सादरीकरण होईल. जेष्ठ अभिनेते पुरुषोत्तम बेर्डे यांची मुलाखत यावेळी घेण्यात येईल.लेखिका विजया वाड यांच्या हस्ते आशा राजदेरकर यांचे "हसताय ना हसायलाच पाहिजे" या पुस्तकासाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कट्ट्याच्या कलाकारांतर्फे "चल अन्याया सामोरी" एकांकिकेचे सादरीकरण होईल.शब्द शब्द हा कवी अरुण म्हात्रे व संकेत म्हात्रे या पितापुत्रांचा काव्यासंवाद रंगणार आहे. एक सांगायचय या चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. डॉ.स्मिता कोष्टी व काव्हेरी कुर्हाडे लवरात्री सिनेमातील नृत्य सादर करतील. परिवहन कर्मचारी यमाची धमाल नवऱ्याची कमाल हे नाटक सादर करतील. विभागातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. सुबोध भावे यांच्या हस्ते फॅमिली कट्टाचे लॉन्चिंग होणार आहे.यावेळी "सुबोध भावे स्पेशल' या कार्यक्रमातुन सुबोध यांचा जीवन प्रवास मांडण्यात येणार आहे.