ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर आता अभिनेत्याप्रमाणेच गायक व वादकांना मिळणार संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:59 PM2018-01-07T15:59:06+5:302018-01-07T16:02:12+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर गाण्याची व वादनाची आवड असणाºया कलाकारांना दर शुक्र वारी आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
ठाणे: अभिनय कट्ट्यावर आजपर्यंत अभिनयाच्या माध्यमातून अनेक पात्रं रंगवली गेली. ठाणे, मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील हजारो कलाकारांना आपल्या अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी अभिनय कट्ट्याने दिली तसेच मालिका, चित्रपटात काम करण्याची संधी सुद्धा या कट्ट्यामुळे सातत्याने मिळत आहे आणि आता कट्ट्याच्या (अभिनय कट्टा कराओके क्लब )संगीत कट्ट्यामुळे प्रत्येक गाण्याची व वादनाची आवड असणाºया जास्तीत जास्त कलाकारांना दर शुक्र वारी अभिनय कट्ट्यावर आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
हा पहिला कट्टा नुकताच पार पडला. संगीत कट्ट्याचे दीपप्रज्वलन ‘चांदणं चांदणं’ फेम व ‘सिंड्रेला’ चित्रपटाचे संगीतिदग्दर्शक ‘किरण वेहेले’ यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या गाजत असलेल्या विविध संगीत मैफिलीत अग्रस्थानी असलेल्या गायिका पौर्णिमा काकडे, समीर दळवी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने संगीत कट्ट्याची सुरु वात केली. त्याचप्रमाणे विविध मराठी व हिंदी गाण्याच्या कार्यक्र माचे सुप्रसिद्ध निवेदक अमित काकडे यांनी सुरु वातीच्या साथसंगत असलेल्या मैफिलीचे निवेदन केले. किरण वेहेले यांनी अतिशय सुंदरपद्धतीने सिंथेसाइजर वाजवीत अनेक वादकांची जागा भरून काढली. त्यांना संकेत गुडे यांनी अतिशय सुंदर साथ दिली.
अभिनय कट्ट्यावर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘अभिनय कट्टा कराओके क्लब’ च्या माध्यमातून ‘जिना यहाँ मरना यहाँ’ या हिंदी गाण्यांच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुक्र मे ‘तुझसे नाराज नाही जिंदगी’, ‘एक अजनबी’, ‘तेरे बिना’, ‘वादा करले’, ‘जाने कहा’, ‘एक प्यार का नगमा है’ , ‘गुलाबी आंखे’, ‘सलामे इश्क’, ‘क्या हुवा तेरा वादा’, ‘हवा के साथ साथ’, ‘जिंदगी कि ना टूटे’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘ओ हिन्सनी’, ‘एक दिन बित जाएगा’ या गाण्यांचे सादरीकरण केले. अनुक्र मे विनोद पवार, ज्ञानेश्वर मराठे, समीर कुलकर्णी, समीर कानडे, राजू पांचाळ व निशा पांचाळ या संगीत कट्ट्याच्या गायक कलाकारांनी सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्र माचे निवेदन संकेत देशपांडे व वीणा छत्रे यांनी केले. अभिनयाप्रमाणे गाण्याची व वादनाची आवड असणाºया अनुभवी तसेच बिनअनुभवी अशा सर्वच हौशी कलाकारांना संगीत कट्ट्यावर संधी देण्यात येईल व ठाण्यातील जास्तीत जास्त कलाप्रेमींनी पुढाकार घ्यावा, आपली गायनाची तसेच वादनाची कला सादर करावी असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी केले.