CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३४२ नव्या रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 08:48 PM2020-10-11T20:48:47+5:302020-10-11T20:49:08+5:30
ठाणे शहरात ३६९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात ४० हजार ८६१ रुग्णं आतापर्यंत नोंदले आहे.
ठाणे: कोरोनाचे एक हजार ३४२ रुग्ण जिल्ह्यात रविवारी सापडले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९१ हजार ८२५ रुग्ण झाले आहेत. तर, ३२ जणांचा आज मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८४६ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे.
ठाणे शहरात ३६९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात ४० हजार ८६१ रुग्णं आतापर्यंत नोंदले आहे. तर,पाच मृत्यू आज झाल्यामुळे एक हजार ६६ मृत्यूंची नोंद केली आहे. कल्याण डोंबिवलीला ३११ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून आठ जणांचे मृत्यू झाले आहे. या शहरांत आतापर्यंत ४६ हजार १८७ रुग्ण बाधीत रुग्ण असून मृतांची संख्या ९०३ झाली आहे.
उल्हासनगरात ४१ नवे रुग्ण तर दोन मृत्यू झाले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या नऊ हजार ६४१ असून मृतांची संख्या ३१७ झाली आहे. भिवंडीला ६५ रुग्ण नव्याने आढळले असून एक मृत्यू आज झाला आहे. या शहरात बाधीत पाच हजार ४५८ रुग्णांची, तर, ३२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला ११२ रुग्ण सापडले असून पाच मृत्यू झाले आहे. तर, बाधितांची संख्या आता २० हजार ३८८ झाली असून मृतांची संख्या ६३४ पर्यंत गेली आहे.
अंबरनाथमध्ये ३४ रुग्ण आज आढळले असून तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आता बाधीत सहा हजार ७६१ रुग्ण असून २४४ मृत्यू आजपर्यंत झाले आहे. बदलापूरमध्ये ३९ रुग्ण नव्याने सापडले असून. बाधीत रुग्ण सहा हजार ७०५ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ७७ कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज ९९ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, एकाचही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत बाधीत रुग्ण १५ हजार ४८० झाले आहेत. तर मृत्यू संख्या ४६५ नोंदवण्यात आली आहे.