काेराेनाच्या नव्या २७१ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:09+5:302021-03-08T04:38:09+5:30
------------------------------------------------------ तुटलेल्या वायरीचा धोका डोंबिवली : एमआयडीसी पेंढरकर महाविद्यालयासमोरील चौकात तुटलेली वायर रस्त्याच्या वर आल्याने ती वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी ...
------------------------------------------------------
तुटलेल्या वायरीचा धोका
डोंबिवली : एमआयडीसी पेंढरकर महाविद्यालयासमोरील चौकात तुटलेली वायर रस्त्याच्या वर आल्याने ती वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनली आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवासी राजू नलावडे यांनी महावितरण कंपनीकडे तक्रार करून लक्ष वेधले आहे.
रस्त्यावरून जाताना अनेक दुचाकीधारकांच्या गाडीच्या चाकात ही केबल अडकून त्या दुचाकी पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ही केबल एक इंच जाडीची आहे. या चौकातील रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जाण्यास मिळत नसल्याने तेथे स्पीड ब्रेकर किंवा सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याच चौकाजवळ के.व्ही. पेंढरकर कॉलेज, एमआयडीसी कार्यालय, सिटी मॉल, तीन मोठ्या बँका, सिस्टर निवेदिता स्कूल, अस्तित्व ही विशेष मुलांची शाळा आणि निवासी संकुले आहेत. त्यामुळे ही केबल तत्काळ काढून टाकण्यात यावी, अशी मागणी नलावडे यांनी केली आहे.
------------------------------------------------------
फोटो आहे