३८ कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:11+5:302021-09-07T04:49:11+5:30
--------------------------------------- आंबिवली उद्यानात जैवविविधतेचा वावर सुरू कल्याण : केडीएमसी आणि एमएमआरडीए यांच्यावतीने कल्याण रिंगरूटचे काम सुरू आहे. या कामात ...
---------------------------------------
आंबिवली उद्यानात जैवविविधतेचा वावर सुरू
कल्याण : केडीएमसी आणि एमएमआरडीए यांच्यावतीने कल्याण रिंगरूटचे काम सुरू आहे. या कामात सुमारे एक हजार ६५० झाडे बाधित होणार आहेत. ती तोडण्यापूर्वी आंबिवली येथील वनजमिनीवर १२ हजारपेक्षा जास्त झाडे दोन वर्षांपूर्वी लावली आहेत. यासाठी एमएमआरडीएने अनुदान दिले आहे. दोन वर्षांत याठिकाणी जंगल उभे राहिले असून ९५ टक्के झाडे जगली आहेत. याठिकाणी सोलर सिस्टिम आणि ठिबक सिंचनचा वापर केला असून याठिकाणी आय नेचरवॉच फाउंडेशन, नवी मुंबई यांच्यामार्फत सीएसआर निधीतून पक्षी उद्यान, वटवाघूळ उद्यान, मधमाशी उद्यान, फुलपाखरू उद्यान, आयुर्वेदिक उद्यान, नक्षत्र वन व पशुपक्षांसाठी तलाव आदी उपक्रम हाती घेतले आहेत. मंगळवारी या जैवविविधता उद्यानाचे लोकार्पण होणार आहे. तत्पूर्वी, याठिकाणी पक्षांसह सरपटणारे प्राणी यांचा वावर सुरू झाल्याची माहिती मनपाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.
---------------------------------------------